अल्पवयीन मुलासमोर अश्लील चाळे करणे आले अंगलट!
जयपूर१२सप्टेंबर:-राजस्थान मधील मधील जयपूर येथे ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलासमोर अश्लील चाळे प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि महिला पोलीस कर्मी या दोघांवरही पास्को कायद्याखाली गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक करण्यात आली आहे.अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि महिला पोलीस कर्मचारी यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अश्लील कृत्य करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि महिला पोलीस कर्मी यांना न्यायालयाने१७सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.एकंदरीत स्वतःच्या ८वर्षाच्या मुलासमोर हे कृत्य केल्याचे दोघांच्याही चांगलेच अंगलट आले आहे. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राजस्थान मध्ये कार्यरत असलेला पोलिस अधीक्षक हिरालाल सैनी आणि पोलीस दलातील एक महिला पोलीस कर्मचारी यांचे गेल्या ४ते५ वर्षांपासून विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. नमूद महिला पोलीस कर्मचारी हिच्या मुलाचा वाढदिवस असल्याने, त्यांनी तो वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरातील पंचतारांकित हॉटेल मध्ये,एक शूट बुकिंग केला,वाढदिवसाचा केक कापल्यावर, शूट समोर असलेल्या स्विमिंग पूल मध्ये,महिला पोलिस कर्मचारी हिच्या मुलासमोर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.या सर्व प्रकाराचे नमूद कर्मचारी हिने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून, तो व्हिडिओ सेव करण्याचा नादात, स्टेटस वर अपलोड झाल्याने,हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून कायद्याचे संपूर्ण ज्ञान असूनही पोलीस अधीक्षक हिरालाल सैनी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल या दोघांनी लहान मुलाच्या समोर अश्लील चाळे करून, पास्को कायद्याखाली गुन्हा केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याने, दोघांनाही लहान मुलांचे लैंगिक शोषण कायदा पास्को खाली अटक करण्यात आली.महिला पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस अधीक्षक आणि तिचे ५० अश्लील व्हिडिओ काढल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच हे व्हिडिओ तिने हिरालाल सैनी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी काढले होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांने असे कृत्य केल्याने पोलीस खात्याची प्रतिमा खालावली असे,मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन पथकाकडून करण्यात येत आहे.