क्राईम ताज्या बातम्या

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची गुटका विक्रेत्यावर कारवाई!

अकोला प्रतिनिधी13जून:-दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या चोहट्टा(बाजार)येथे 13जूनच्या सकाळी 9 वाजता दरम्यान चोहट्टा(बाजार)येथील येथे अवैध प्रतिबंधित गुटक्याची विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली. त्यांच्या कडून 76 हजार रुपयांच्यावर किंमतीचा प्रतिबंधीत गुटका ताब्यात घेण्यात आला.या कारवाईत शाहबाबू नामदारशाह अशकनशाह वय ३८ रा. चोहटा (बाजार) २)रफिक शाह नाजुल्लाह शाह वय ४३ रा चोहटा (बाजार) यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या चोहट्टा(बाजार)येथे प्रतिबंधीत गुटक्याची विक्री करण्यात येत आहे. अशा माहितीच्या आधारे शाहबाबू नामदारशाह अशकनशाह वय ३८ रा. चोहटा (बाजार) २)रफिक शाह नाजुल्लाह शाह वय ४३ रा चोहटा (बाजार)यांच्या यांच्या दुकानांची आणि घरांची झडती घेतली असता,त्यांच्या दुकानातून आणि घरातून प्रतिबंधीत असलेल्या विमल, सितात,नजर,हॉट, राजनिवास गुटक्याचा76,401 रुपयांचा गुटक्याचा माल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने केली.:-अमरावती परिक्षेत्राचे डीआयजी चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाचे प्रमुख एपीआय निलेश देशमुख यांनी,अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या अकोला बिजनेस सेंटर येथे 3 जून 2022 च्या रात्री, अकोला जिल्ह्यातील गुटका माफियाच्या गोडाऊन वर छापा टाकून 76 लाख रुपयांच्या वर मुद्देमाल जप्त केला होता.त्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जुने शहर पोलीस ठाण्याचे डीबीस्कॉड सर्व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 13 जून रोजी विशेष पथकाने चोहट्टा(बाजार) येथे केलेल्या गुटका विक्री कारवाईच्या पार्श्वभूमीवर दहीहंडा पोलिसांवर पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे