क्राईम

पोलीसबंदीगृहात आरोपीची शर्टाच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या!

 

अमरावती१९ऑगस्ट:-अमरावती शहर हद्दीत येत असलेल्या राजपेठ पोलीस स्टेशनच्या बंदीगृहात,स्वतःच्या शर्टाच्या साह्याने एका २४वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की,वर्धा जिल्ह्यातील आष्टी गावाचा रहिवासी असलेल्या २४वर्षीय सागर ठाकरे याच्या विरोधात अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होता. त्यावरून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात बंदीगृह नसल्याने, मृतक सागर ठाकरे याला,राजपेठ पोलीस ठाण्याच्या बंदीगृहात ठेवण्यात आले होते,मृतक सागर ठाकरे याने बुधवारी  रात्रीउशीरा अंगातील शर्टाच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.ही बाब गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्याच्या या आत्महत्याने राजपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. सागर ठाकरे याने आत्महत्या का केली,याचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.