चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप ३६ हजार ७७० मतांनी विजयी
मुंबई: पुण्यातील कसाबा पेठ मतदार संघात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. या ठिकाणी २८ वर्षांच्या विजयाची परंपरा मोडित काढते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजय
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचा निधनाने ही निवडणूक झाली.चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला. या ठिकाणी राहुल कलाटे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. मात्र, जगताप यांनी जवळपास ३६ हजार ७७० मतांनी विजय मिळवला.
कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल.
सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.