औरंगाबाद

 पेढ्यात गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार!

बलात्काराचा व्हिडिओ काढून,ब्लॅक मेल करीत सतत चार महीने लैंगिक शोषण! 

 

पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

औरंगाबाद १२डिसेंबर:-औरंगाबाद येथून जवळच असलेल्या वाळूज वाळूज तालुक्यातील रांजणगाव (शेणपुंजी) या ठिकाणी ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण एवढयावरच थांबता, त्याने बलात्कार करण्याचा व्हिडीओ शूट करून, नमूद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ,सतत चार महिने या महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणारा युवक हा पीडित महिलेचा शेजारी असल्याचे समजते.हे कृत्य हा युवक गेल्या चार महिन्यापासून करीत होता.अखेर पीडित महिलेची सहन शक्ती संपल्याने,तीने तीच्या सोबत घडलेला घटनाक्रम तीच्या पतीला सांगितला, त्यावर पतीने तीला धीर देत, संबंधित प्रकारची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात दाखल केली, या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी कलम३७६ सह ब्लॅकमेल चा गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. नितीन अशोक पतींगे वय२४वर्षे, रा.रांजणगाव(शेनपुंजी)जि. औरंगाबाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पती आणि मुलांसह रांजणगावात पतंगेच्या कॉलनीत भाड्याने राहत होती. याचदरम्यान आरोपीची पीडितेशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर  8 एप्रिल 2021 रोजी आरोपी नितीन याने पीडित महिलेला गुंगीचं औषध टाकलेला पेढा खायला दिला होता. त्यामुळे पीडित महिला बेशुद्ध झाली होती. याचा फायदा घेत नितीनने बेशुद्धावस्थेतील महिलेवर बलात्कार केला आणि संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला. शुद्धीवर आल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचं तिला समजलं.पण घटनेची वाच्यता केल्यास संबंधित व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीनं दिली. यानंतर ब्लॅकमेल करत आरोपीनं चार महिने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. 20 नोव्हेंबर रोजी देखील आरोपीनं पीडितेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडितेनं सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने धीर दिल्यानंतर पीडितेनं वाळूज पोलीस ठाण्यात नितीन विरोधात गुन्ह दाखल केला आहे. आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस आहेत.