मुंबई दि.७सप्टेंबर:- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पेट्रोल डिझेल गॅस आणि खाद्यतेलासह इतरही जिवननाश्यक वस्तुची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे या जिवघेण्या महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे तेव्हा या महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश बहुजन जनता दलाच्या वतीने दि,३ सष्टेबर २०२१ शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता मुंबई येथील आझाद मैदान येथे बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले,बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला आहे,जनतेची लूट थांबलीच पाहिजे, पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली सदर मागणीचे निवेदन मंत्रालय येथे जाऊन बहुजन जनता दलाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले,यावेळी शाम चौधरी रहेमान खान संभाजी गायकवाड राजेंद्र जाधव मंगला बनसोडे मंदा डांगळे शितल उगले शोभा वानखेडे सुभाष सुरवाडे हिम्मत पाटील अंकुश पवारे रामचंद्र साबळे शांताराम गावंडे भावना गायकवाड राजेंद्र पाटील दिनेश आमले दादासाहेब तोरणे किशोर कदम यांच्या सह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Post Views: 394