मुंबई

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ,पेट्रोल११६तर डिझेलच्या किंमतीने १०६.५९ रुपयांचा उच्चांक गाठला!

मुंबई १७ऑक्टोबर:-देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असून, राज्याच्या राजधानी मध्ये एक लिटर पेट्रोल साठी १११रुपये तर एक लिटर डिझेलसाठी १०५.५९रुपये मोजावे लागणार आहेत.सर्व सामान्यांना अच्छे दिन चे स्वप्नाच्या भूल थापा देऊन,इंधनाच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून, मोदी सरकारने जनतेचे कंबरडे मोडले आहे.मध्ये प्रदेशातल्या बालाघाट या ठिकाणी पेट्रोल ची किंमत प्रति लिटर 116 रूपये इतकी पोहचली आहे. तर डिझेलचे दर 105 रूपये 59 पैसे प्रति लिटर इतकी झाली आहे.राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई मध्ये १११रुपये प्रती लिटर  मोजावे लागणार असून.महाराष्ट्रातली प्रमुख शहरं आणि पेट्रोलचे दर प्रति लिटर,मुंबई – 111.77,नागपूर 111.49,नाशिक-112.40,पुणे- 111.61,ठाणे- 111.61,औरंगाबाद- 112. 09,जळगाव-113.20,नांदेड-113.59,नंदुरबार-112.50,रत्नागिरी- 113. 19,मुंबई – 111.77, एकूणच महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांवर नजर टाकली तर लक्षात येतं की नंदुरबार, रत्नागिरी आणि जळगाव या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने प्रति लिटर 113 रुपयांचा आकडा पार केला आहे.