उमेश मेश्राम
पुणे६सप्टेंबर पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून एका१४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच अपहरण करून तिच्यावर गॅंगरेप करण्याची घटना घडली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी७ नराधमांना अटक केली आहे. याप्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की,३१ऑगस्ट रोजी १४वर्षीय मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे आली होती. मुलीला एकटी बघून, रिक्षा चालकाने तिच्या जवळ जाऊन, आता तुला ज्या गावी जायचे आहे,त्या गावी जाण्यासाठी आज गाडी नाही,असे सांगून आज रात्री तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून तिला रेल्वे स्टेशन परिसराच्या बाहेर आणले, त्यानंतर तीचे अपहरण करून पुणे जिल्ह्यातील वानवडी परिसरात घेऊन जाऊन तिच्यावर रिक्षा चालकांनी रात्रभर बलात्कार केला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा बलात्कार केला. हा गँगरेप ७ नराधमांनी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या गॅंगरेप प्रकरणी वानवडी पोलिसांनी८नराधमांना अटक केली आहे, पोलीस सूत्रांकडून आलेल्या माहिती नुसार,३१ऑगस्टला गावी जाण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलगी,पुणे रेल्वे स्टेशनवर आली तीला एकटीला बघून आरोपी रिक्षा चालकाने तुला जाण्यासाठी आज गाडी नाही असे सांगत, तूझी आज राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून रेल्वे स्टेशनवरूनवानवडी परिसरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने पाशवी बलात्कार केला. त्यानंतर तिला पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरवल,सुरवातीला ६रिक्षा चालकांचा बलात्कार करण्यात सहभाग होता, पीडित मुलीला एका गुप्त ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते, दुसऱ्या दिवशी म्हणजेच,१सप्टेंबर रोजी रेल्वेच्या दोन चतुर्थी कर्मचारी असलेल्या दोन कामगारांनी सुद्धा पीडित अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संभोग केला.पीडित अल्पवयीन मुलगी सातव्या वर्गात शिक्षण घेत असून, ती मुलगी घरी न सांगता बाहेर गावी जाण्यासाठी निघाली असल्याने, तिच्या पालकांनी पोलिसांत ती हरविल्याची तक्रार दाखल केली होती.हे नराधम गेल्या पाच दिवसापासून तिच्यावर बलात्कार करीत होते.हा धक्कादायक प्रकार५सप्टेंबर रोजी उघडकीस आला. पोलिसांनी आतापर्यंत७आरोपींना अटक केली असुन, या घटनेत आणखी कोण सहभागी आहेत,तसेच या गॅंग रेप प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.वानवडी पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आलेल्या७आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सातही आरोपींना१०दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पीडित मुलीची परिस्थिती गंभीर असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.