पुणे 8 ऑगस्ट: कोरोनाच्याच पार्श्वभूमीवर लागू असलेल्या नियमांमध्ये पुुणेकरांंना शिथिलता देेन्यात आली आहे, आज (रविवारी 8 ऑगस्ट ) महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा बदल करण्यात आलेले आहेत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे दुकावे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु सुरु राहणार आहे. पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पुण्यातील निर्बंधांमधुन सवलत देतोय पण जर पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील पॉझिटिव्हीटी रेट जर सात टक्क्यांच्यावर गेला तर ही शिथिलता पुन्हा मागे घेतली जाईल. त्यामुळे लोकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे देखील अजित पवार या वेळी म्हणाले,पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार, हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार रात्री 10 पर्यंत सुरू राहणार,पुण्यात मॉल्सही रात्री 8 पर्यंत सुरू, लशीचे 2 डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाईल,जलतरण तलाव वगळून इतर इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा प्रकार सुरु राहतील, शनिवार रविवार सर्व सेवांना दुपारी 4 पर्यंत परवानगी असेल,शहरातील सर्व उद्याने नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत,नागरिकरांना मास्क लावणे बंधनकारक असेल,पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटेल, दुकाने संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत