अकोला: पारस येथील औष्णिक केंद्रात नुकताच ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.शून्य हानी हे लक्ष्य घेऊन प्रारंभ झालेल्या या सुरक्षितता सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
मुख्य अभियंता सोनपेठकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक सुरक्षा आरोग्यचे संचालक रत्नपारखी,अधीक्षक अभियंता कांबळे,प्रभारी अधीक्षक अभियंता गट्टूवार, वरिष्ठ उप माव्यवस्थापक वानखडे,वैद्यकीय अधिकारी डॉ. ताले,मैंदाड आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्याकरिता सुरक्षा विषयी नाटक सादर करण्यात आले.
या प्रभावी नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून नाटकाचे कौतुक करण्यात आले.संचालन श्रीकृष्ण अरखराव यांनी तर आभार मैंदाड यांनी मानलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंडे,डाखोडे,भाकरे साहेब,खोंड, मेंढेकर, कल्याण अधिकारी, गजभिये,शेख रोउफ,भारती अंभोरे आदींनी मेहनत घेतली.यावेळी सर्व विभाग प्रमुख,अभियंता, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .