विदर्भ

पातूर येथे अस्थिरोग निदान शिबिर

 

हाडाच्या विविध आजाराची वेळीच काळजी घ्या
डॉ अमोल बोचरे

पातूर१६ऑगस्ट:- आजच्या धावपळीच्या युगात आहार , व्यायाम, कमी झाल्याने हाडाचे विविध आजार वाढले असल्याने तरुण पणीच अपंगत्वाचा त्रास अनेकांना सुरू झाला आहे,त्याचा वर वेळीच तपासणी किवा योग्य सल्ला न घेतल्यास शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यासाठी वेळीच तपासणी करावी असे अकोला येथील पुंडलिकार्पण हॉस्पिटल चे प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ अमोल बोचरे यांनी असे आव्हाहन,पातूर येथील लोकसेवा परिवार च्या वतीने , भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्याने दि 14-08-21 शनिवार रोजी आयोजित भव्य अस्थिरोग शिबिरामध्ये हाडाची ठीसुळता(BMD),टेस्ट व हाडाचे विविध आजाराचे निदान व योग्य मार्ग दर्शन करताना सांगितले शनिवारी झालेल्या या शिबीरामध्ये 164 ओ पी डी,140 बीएमडी टेस्ट , व एका हात फॅक्चर रुग्णाला प्रथोमोपचार अश्या सर्व तपासणीसह रुग्णांवर उपचार करण्यात आले,

सामाजिक जाणिव…
तुमच्याही योगदानाची गरज!या संकल्पनेवर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,पंचक्रोशीतील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला , नेहमीच पातूर येथील लोकसेवा परिवार समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतो ,समाजाच्या तळागाळातील गरीब, गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांना सेवा देने हा हेतू असतो, शिबिर आयोजन प्रसंगी आयोजक अजिंक्य प्रकाशराव निमकडे, व डॉ सप्नील ढोकणे यांच्यासह, निखिल इंगळे,सचिन बायस, निलेश गवई, अविनाश गवई, शुभम उगले,गणेश करंगळे,गणेश सिताबराव, गुलाब पाटील,तुषार शेवलकार, देविदास इंगळे,अजय पाटील,अक्षय गाडगे,अभि उगले, आदित्य इंगळे,संचित काळपांडे,वैभव काळपांडे, आदींनी परिश्रम घेतले,