क्राईम

*पातूर पोलिसांचा वचकच संपल्याने चोरीच्या घटनेत वाढ


वृद्ध महिलेचे तीस हाजारांचे दागिने पळविले

पातूर पोलिसांना चोरट्यांचे खुले आव्हान

पातूर प्रतिनिधी18सप्टेंबर : शहरातील आठवडी बाजारात होणाऱ्या चोरीचे सत्र थांबता थांबेना !
पातूर शहरात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो या बाजारातून प्रत्येक आठवड्याला अनेकांचे पाकीट,मोबाईल,मंगळसूत्र चोरी झाल्याच्या घटना घडत आहेत.तसेच काही महिन्यांपूर्वी पातूर पोलिसांत कार्यरत असलेल्या पोलिसांचे देखील मोबाईल याच आठवडी बाजारात चोरट्यांनी उडवल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.चक्क पोलिसांचेच मोबाईल चोरट्यांनी पळविले,मग सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय ? आज दि.17/09/2022 रोजी दुपारच्या सुमारास एका वृद्ध महिलेच्या पिशवीतून दागिन्यांचे पाकीट चोरी गेल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की शिर्ला येथील प्रभाबाई शावजी वाडेकर (वय 65) या वृद्ध महिलेने पातुरातीलच एका नामांकित सोन्या-चांदीच्या दुकानात येऊन काही चांदीचे दागिने खरेदी केले व सोबत आणलेल्या काही सोने व चांदीच्या दागिन्यांना डाग दिला,त्यानंतर सदर महिला ही जुन्या बस स्थानकानजिक असलेल्या फळांच्या दुकानातुन फळ खरेदी केली व नंतर बाजूलाच असलेल्या पाणीपुरीच्या ठेल्यावर येऊन पाणीपुरी खात असतांना हातातील पिशवीतून महिलेवर पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्यांनी चांदीच्या तोरड्या, चांदीचा करदोरा व सोन्याचे कानातले असे अंदाजे तीस हजार रुपयांचे दागिने असलेले पाकीट उडविले.
सदर महिला पातुरातील काम आटपून शिर्ला येथे आपल्या घरी गेली असता पिशवीतील दागिन्यांचे पाकीट चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पातूर पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची माहिती दिली मात्र वृत्त लिहिस्तोवर पातूर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

पातूर शहरातील आठवडी बाजारतुन होत असलेल्या चोरीच्या घटना वाढतच असून खुद्द पोलिसच जर या चोरट्यांची शिकार होत असतील तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न गौणच आहे !
*केवळ हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असूनदेखील चोर आपला डाव राजरोसपणे साधत आहे,यामुळे पातूर पोलिसांचा वचकच राहिला नाही असे जणमाणसात बोलले जात आहे.