वार्तापत्र – प्रमोद कढ़ोणे
पातूर – तालुक्यात होवु घातलेल्या शिर्ला जिल्हा परिषदसह शिर्ला, खानापुर व आलेगांव पंचायत समीती गणाची निवडणुक काही दिवसावर येवुन ठेपली आहे या निवडणूकी मध्ये राजकीय पक्षाचे उमेदवार रिगणात असल्याने राजकीय पक्षाची प्रतिष्ठापणाला लागली आहे आपल्या पक्षाचे उमेदवार विजयी होण्या करीता लोकप्रतिनीधीनी कंबर कसली आहे. शिर्ला पंचायत समीती जिल्हा परिषद व पंचायत समीती गणा मध्ये पातूर शहरातील मोठा भाग आल्याने पातूर लगत असलेल्या जिरायत पातूर, बगायत पातूर व पट्टे आमराई पातूर भागातील मतदाराच्या कौल व जातीय समीकरण या मध्ये महत्वाचा ठरणार आहे या निवडणुकी शिवसेना राका ची युती आहे तर भाजपा, कॉग्रेस व वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे ची भुमीका घेतल्याने या वेळी तालुक्यात बहुतेक ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र दिसणार आहे गत निवडणुकात शिर्ला गटात वंचित बहुजन आघाडीने तर गणात शिवसेनेने बाजी मारली होती या वेळी हा गड ते राखणार या कडे लक्ष राहणार आहे
पातूर तालुक्यात शिर्ला जि.प. प.स तर खानापुर व आलेगांव पं.स गणा करीता निवडणूक होणार आहे निवडणूकीचा बिगुल वाजल्या नंतर जातीय समीकरण समोर ठेवुन सर्व पक्षाने आपले उमेदवार रिगणात उतरविले आहे शिवसेना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने अरुण कचाले, भाजपाच्या वतीने अंनत उर्फ बाळु बगाडे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुनिल फाटकर, कॉग्रेसच्या वतीने शरद अमानकर तर रिपाई आठवले गटाचे सागर इंगळे मैदानात आहे तर पंचायत गणा करीता शिर्ला मध्ये शिवसेनाच्या वतीने मनिषा श्रीकांत ढोणे,भाजपा पुरस्कुत रेणुका गजानन गाडगे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जमीलाबानो जाफरशाह, कॉग्रेसच्या नसरीन खान मो. जहीर तर अपक्ष भागश्री गवई खानापुर गणात शिवसेनेच्या प्रतिभा सुनिल गाडगे, भाजपाच्या संगीता गोपाल गालट, वंचित बहुजन आघाडीच्या सुनिता अर्जुन टप्पे, तर कॉग्रेसच्या वतान्ीे रुख्मीनाबाई व्यवहारे आलेगांव गणात भाजपाचे राजेश काळपांडे, वंचित बहुजन आघाडीचे इमरान खान, शिवसेनाच्या वतीने दत्तात्रय राऊत तर कॉग्रेसच्या वतीने सै जुनेद सै इसा रिगणात आहे या वेळी सर्व राजकीय पक्षाने जातीय समीकरण समोर ठेवुन आपले उमेदवार रिगणात उतरविले आहे आलेगांव ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने आलेगांव गणाच्या निवडणुकी कडे तालुक्या वासियाचे लक्ष लागले पातूर शहरातील मोठा भाग हा शिर्लात गेल्याने मुस्लीम व ओबीसी इतर मतदारा मोठ्या प्रमाणात मतदार वाढला आहे या मुळे या निवडणुकीत पक्षाचे पांरपारीक मतदारा सोबत जातीय समीकरण ठेवण्याचा पर्यत राजकीय पक्षा कडुन झाला आहे कॉग्रेस पक्षाने या वेळी स्वबळावर निवडणुक लढविणार असल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या व कॉग्रेस पक्षाच्या मताचे काही प्रमाणात विभाजन होणार असल्याचे चित्र दिसत असले तरी मतदार हा हुशार झाला असुन योग्य उमेदवाराची निवड करणार असल्याचे बोलले जात आहे सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारानी जातीय समीकरण समोर ठेवुन आपले उमेदवार रिगणात उतरविले आहे शिर्ला गटात शिवसेनेने गवळी मराठा व माळी समाजाची भाजपाने माळी समाज व त्याचा पारपांरीक मतदार, वंचित बहुजन आघाडीने कुणबी व मुस्लीम तर कॉग्रेस पक्षाने मराठा व मुस्लीम कार्ड खेळले आहे शिवाय प्रत्येक पक्षाचा पारपांरीक मतदार पक्षाच्या सोबत आहे पातूर शहरातील मुजावर पुरा सह बागायत , जिरायत व पट्टेआमराई पातूर सह मिलींद नगर मधील काही भाग हा शिर्ला हद्दीत गेल्याने या मतदाराचा भरवशावर निवडणूक निकालाचे समीकरण अवलबुन राहणार आहे.या भागातील मतदार रिगणातील उमेदवाराचे भाग्यात उलटफेर करु शकणार आहे या निवडणूक राजकीय पक्षानी आपली ताकत पणाला लावली असुन या निवडणुकीच्या निकालावर पंचायत समीतीचे सत्ता समीकरण अवलबुन राहणार आहे पातूर पंचायत समीती मध्ये शिवसेना व कॉग्रेस पक्षाची सत्ता होती परंतू ओबीसी आरक्षणाच्या निकाला मध्ये शिवसेना , वंचित बहुजन आघाडी व कॉग्रेस पक्षाचे प्रत्येकी उमेदवारचे पद खारीज झाल्याने या निवडणुकी मध्ये विजयी मिळविण्या करीता वंचित बहुजन आघाडी व शिवसेना व काग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिवाचे रान करीत आहे. शिर्ला गटात दिग्रस गणा मध्ये सुध्दा कोणत्या राजकीय पक्षाला मतदार कौल देणार हे सुध्दा महत्वाचे ठरणार आहे . पातूर पंचायत समीतीवर सत्ता कायम ठेवण्या करीता आमदार नितीन देशमुख यानी मतदारा संघाचे दौरे करीत भेटी गाठी वाढविल्या आहे तर भाजपाच्या उमेदवाराना विजयी करण्या करीता आमदार रणधीर सावरकर व प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात हे सुध्दा तालुक्यात मतदार संघ पिजुन काढत मतदारा सोबत संपर्क साधत आहे शिवाय प्रत्येक पक्षाने आपल्या माजी आमदारासह राजकीय पुढार्याची फौज मतदार संघात पाठवुन जातीय समीकरण राखण्याचा प्रयन्न करीत आहे दरम्यान जातीय समीकरण व पक्षाचे मतदार या वर या निवडणुकीचा निकाल लागणार आहे परंतू गेल्या काही दिवसा पासून तालुक्यात राजकीय वातावरण तापले असुन काही संधासाधु प्रत्येक उमेदवाराच्या संपर्कात असुन आपण आपल्या करीता काम करीत असल्याचे भासवत आहे होवु घातलेल्या निवडणुकी मध्ये विकास कामाचा सुध्दा समोर केल्या जात असुन उमेदवार मतदाराच्या दारी गेल्या नंतर अनेक ठिकाणी मतदार समस्याचा पाढा वाचत असल्याचे चित्र दिसत आहे परंतू निवडणुक निकाला नंतर मतदारानी कोणाला कौल दिला समोर येणार आहे.