क्राईम

पातूर तालुक्यातील पहाडसिंगी येथे महिलेचा चिमुकल्यासह मृतदेह आढळल्याने खळबळ

 

 

रात्रीपासून होती बेपत्ता ; घातपाताची शक्यता

प्रमोद कढोने,पातूर18 ऑक्टो : तालुक्यातील पहाडसिंगी येथे शेतातील विहिरीत एका महिलेचा आपल्या चिमुकल्यासह मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
दि.18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास पातूर तालुक्यातील पहाडसिंगी येथे शेतातील विहिरीत एक महिला आपल्या चिमुकल्या बाळासह मृतावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. सदर माहिती चान्नी पोलिसांना मिळाल्यावरून चान्नी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता शेतातील विहिरीत सदर महिला व तिचा चिमुकला मुलगा मृतावस्थेत असल्याचे आढळून आले.सदर मृतक महिला गोकुळा प्रदिप लटके (वय अंदाजे 28 वर्ष) रा.पहाडसिंगी व विर प्रदीप लटके (वय 1 वर्ष) असल्याचे निष्पन्न झाले असून ही महिला काल दि.17/10/2022 पासून बेपत्ता असल्याची तक्रार चान्नी पोलिसांत दाखल होती.दरम्यान सकाळी नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध घेतला असता सदर स्वतःच्या शेतातील विहिरीजवळ महिलेच्या चपला दिसल्याने विहिरीत पाहिले असता महिलेचा व बाळाचा मृतदेह आढळून आला.सदर महिलेस दोन मुले असून मोठा मुलगा घरीच ठेवून छोटा मुलगा विर याला घेऊन विहिरीमध्ये आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.ही नेमकी आत्महत्या आहे की घातपात याकडे पोलिसांचे लक्ष असून पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.यावेळी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, पी.एस.आय.गणेश महाजन,पो.हे.कॉ.शिंदे पो.कॉ.करवते, पो.कॉ.योगेश डाबेराव,पो.कॉ.चव्हाण,पो.कॉ. गीते,पो.कॉ.विजय चोरपगार यांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून मर्ग दाखल केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविला.अधिक तपास चान्नी पोलीस करीत आहेत.