ताज्या बातम्या विदर्भ

*पातूरच्या गौरव श्रीनाथ याने वाचविले युवकाचे प्राण

 

रामेश्वर वाढी

*पातूर१६ऑगस्ट :-*पातुर घाटाच्या सानिध्यात वसलेल्या धोधानी पर्यटन परिसरात असलेल्या धबधब्या जवळील डोहात काही तरुण पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी एक तरुण बुडत होता. बुडणाऱ्या युवकाने सर्व कडे मदतीची अपेक्षा केली होती परंतु तेथील उपस्थितीत असलेल्या त्या तरुणाच्या मित्रांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्या वेळी च बाजूला झाडा खाली बसलेल्या गौरव सुरेश श्रीनाथ याने तिथ जाऊन बघितले. तेव्हा त्याने हवेने भरलेले टयुब युवकाकडे फेकले परंतु सदर युवकाला ते पकडता आले नाही ते बघताच गौरव ने स्वतः च्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेतली आणि त्या युवकाचे प्राण वाचविले. व मागील आठवड्यात धोदाणी धबधबा पर्यटन बघण्याकरिता अकोला येथील दाते परिवार सुद्धा आला होता त्या परिवारातील महिला आहात जुन्या कविता पाण्याजवळ गेल्याने पाय घसरून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून धबधब्याच्या असलेल्या फुल पाण्यामध्ये त्या पडल्याने त्यांच्या टोंगळ्याला ईजा झाली होती तिथे उपस्थित असलेला युवक रंगीत गाडेकर याने सुद्धा पाण्यामध्ये उडी घेऊन महिलेला पाण्याच्या बाहेर आणले असता लगत असलेल्या धोदानी येथे आणून त्यांच्या वैयक्तिक गाडी पर्यंत पोचविले त्वरित त्यांना उपचाराकरिता अकोला येथे रवानगी केली, मागिल आठवड्यामध्ये अकोला येथील रहिवासी शुभम नावाचा मुलगा घसरून पडल्याने त्याचे सुद्धा प्राण रणजित गाडेकर यांनी वाचवले
या कार्यामुळे गौरव , व रणजीत या तरुण युवकांनी केलेल्या कार्याबद्दल सगळीकडे कौतुकास्पद कार्य केल्याचे तालुक्यात प्रशन्सा होत आहे.असे बहादुर तरुणांची या देशाला गरज आहे. १५ ऑगस्ट च्या दिवशीच ३:३० वाजता या शौर्याची प्रचिती आली. आणि गौरवचा साधे पणा यातून दिसून येतो की ज्या तरुणाचे त्याने प्राण वाचविले त्याचे नाव सुद्धा त्याला माहिती नाही.