अकोला

पातुर शहर विकासासाठी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या प्रयत्नाने पाच कोटी निधी मंजुर

चालु वर्षात नऊ कोटी रुपये किंमतीच्या कामाला सुरवात

 प्रमोद कढ़ोणे

पातुर प्रतिनिधी१०नोव्हेंबर :– बाळापुर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या अथक प्रयत्नातुन पातुर शहरातील धार्मिक स्थळे विकसीत करण्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी हा वैशिष्ट्य पुर्ण योजने अंतर्गत मंजुर केला आहे . पातुर शहरातील श्री. खडकेश्वर मंदीरांच्या सभागृह व आवारभिंत तसेच स्वच्छता गृह करीता एक कोटी पंचविस लाख रुपये , शहरातील प्रसिध्द शाहबाबु दर्गा येथे आवार भिंत व सौदंर्यीकरणासाठी दोन कोटी , श्री.सिदाजी महाराज संस्थान आवारभिंत व सभा मंडप करीता एक कोटी रुपये , पाटील मंडळी मारोती मंदीर सभागृहासाठी पन्नास लाख रुपये , कान्होबा चौक हनुमान मंदीर सभागृहसाठी पंचवीस लाख रुपये मंजुर झाले आहे . मागील तिन महीण्या अगोदर पातुर शहराकरीता दोन कोटी मंजुर करुन पातुर शहरातील कामाला सुरवात झाली आहे .तसेच पातुर शहरातील प्रमुख मार्गवर दोन कोटी रुपयाचे हँमर्स लाईट मजुर झाले आहे. चालु वर्षात पातुर शहरासाठी नऊ कोटी रुपये मंजुर करुन विकास कामाला सुरवात झाली आहे .पातुर शहराचा विकास कामा करीता एवढी मोठी निधी मंजुर करणारे पहीले आमदार असल्याचे जनसामान्यात चर्चा आहे.