पातुर : शहरात जुने बस स्थानक व पातुर शहर काँग्रेस कमिटीचे चे जन संपर्क कार्यलय येथे कसबा विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाड़ी चे उमेदवार रविंद्र धंगेकर विजय झाल्या बद्दल महाविकास आघाडी पातुर तर्फे फटाक्याची आतिशबाजी, व ढोल ताशाच्या गजरात तसेच पेढे वाटुन जल्लोष करण्यात आला.
या जल्लोष कार्यक्रमला माजी आमदार तुकाराम बिडकर,प्रदेश संघटक सचिव कृष्ण भाऊ अंधारे, कांग्रेस नेते हाजी सै बुरहान ठेकेदार, हाजी सै कमरोद्दीन, पातुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश गावंडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद, राष्ट्रवादी चे रामकुमार अमानकर, भिमराव कोथळकर, बब्बु भाई शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष चंद्रकांत बारताशे, सै मुज़म्मील, विलास देवकर,मधुकर इंगळे, गजानन चव्हाण, मनोहर वगरे,दिपक गावंडे, वाजीद अली,मोहम्मद अली,बब्बु डान,कामील खान,युसूफ खान,बंडू परमाळे,अब्दुल रहेमान,इंजिनिअर अय्युब खान,हरी भाऊ चोपडे,सै बुडन अतार, संजयसिंह चव्हाण, बंटी गहिलोत,संदीप भाऊ फुलारी, अज़गर खान , दिवाकर अंभोरे, सह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.