अकोला

पाण्याच्या टाकीला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

पातूर नजीक देऊळगाव एमआयडीसी येथील घटना

पातूर : पातूर नजीक असलेल्या देऊळगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या देऊळगाव शिवारातील पाण्याच्या टाकीला गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पातूर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊळगाव शिवारात असलेल्या पाण्याच्या टाकीला एक इसम गळफास घेऊन लटकत असल्याचे निदर्शनास आले असता स्थानिकांनी सदर घटनेची माहिती पातूर पोलिसांना दिली.

पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता तब्बल 60 फूट उंचीवर सदर इसमाचे प्रेत लटकून असल्याचे दिसले.सदर प्रकरणी प्रथम चौकशी केली असता मृतक पेशाने प्राध्यापक असून अशोक दौलत गवई (वय अंदाजे 50) रा.साईनगर पातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले.यावेळी मृतदेह खाली उतरवण्यासाठी पत्रकार दुले खान,स्वप्निल सुरवाडे,प्रमोद कढोणे,किरण निमकंडे, रणजीत गाडेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

दरम्यान पातूर पोलिस दलाचे पो.उपनिरीक्षक गजानन पोटे,पो.उपनिरीक्षक मीरा सोनुने,हे.कॉ.मोहन भारस्कर, अभिजित आसोलकर, छायाचित्रकार सतीश कांबळे, होमगार्ड नितीन डोंगरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असून अधिक तपास ठाणेदार हरिष गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत.