टाकळी खेट्री परिसरातील शासकीय जागेतून वाळूचे उत्खनन प्रकरण
प्रमोद कढोने
पातुर २३ऑक्टोबर:– तालुक्यातील टाकळी खेट्री परिसरातील शासकीय जागेतून वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक केल्या प्रकरणी पाच वाळू माफिया वर २३ लाख ७४ हजार ९९० रुपये दंडाची कारवाई करण्यात आल्याने वाळू माफियांचे धाबे दणानले आहे. टाकळी खेट्री परिसरातील शासकीय जागेतून शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार १६ सप्टेंबर रोजी उघडकीस आला होता. टाकळी खेट्री परिसरातील शासकीय जागेतून गेल्या दोन महिन्यापासून वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचे उघडकीस आले होते. वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतुकीमुळे शेतरस्त्यांची ऐशीतैशी झाल्याने टाकळी खेट्री परिसरातील शेतकऱ्यांनी थेट पातूरच्या तहसिलदाराकडे भ्रमणध्वनीवरून तक्रार केली होती. या तक्रारीची तहसीलदार दीपक बाजड यांनी दखल घेऊन नायब तहसीलदार सय्यद एहसानोद्दिन, मंडळ अधिकारी एन आर बडेरे, व तलाठी मिलिंद ईचे यांना पंचनामा करण्यासाठी पाठविले होते. वाळूचे उत्खनन झाल्याबाबत त्या ठिकाणचा पंचनामा केले असता, शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे शासकीय जागेतून वाळूची विक्री करणाऱ्यासह वाळू माफियांचे नावाचा पंचनामा तलाठी मिलिंद ईचे यांनी तहसीलदारांकडे सादर केला होता. सदर पंचनाम्या नुसार पाच जणांना तहसीलदार यांनी नोटीस बजावून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले होते. त्यावर पाच वाळू माफियावर २३ लाख ७४ हजार ९५० रुपयये दंडाची कारवाई पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी केली आहे. सदर दंडाची रक्कम एका महिन्यात भरा अन्यथा शासनाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे.सुरेश आत्माराम तिडके रा.खेट्री,जावेद खान अनीमुल्ला खान,फिरोजखान नूरखान रा. शिरपूर,रविंद्र मानकर रा.पिंपळखुटा ,योगेश दिलीप ताले असे दंड आकारल्या रेती माफियांची नांवे आहेत. त्यांना प्रत्येकी चार लाख ७४हजार ९९०रुपये दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.
तलाठ्यांना निलंबित नंतर दुसरा दणका
टाकळी खेट्री परिसरातील शासकीय जागेतून शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन झाल्याने जबाबदार असलेले तलाठी मीलिंद ईचे यांना तहसीलदार यांनी नुकतेच निलंबित करण्याची कारवाई केली आहे. त्यानंतर पाच वाळू माफिया वर दंडाची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली असल्याने, रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
वाळू माफिया महसूल विभागाच्या रडारवर
शासकीय जागेतून वाळूचे उत्खनन झाल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहे. आणि तहसीलदार नायब तहसीलदार यांनी अनेक दंडाच्या कारवाया सुद्धा केल्या आहे. तरीही तालुक्यातील वाळू माफिया रेतीची तस्करी अजूनही करीत असल्याने, वाळू माफियांचा पाठीराखा कोण असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण उपस्थित होत आहे.