अकोला : पशुसंवर्धन विभाग आणि स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशूविज्ञान संस्था,अकोला यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधुन पशुपालक महिलांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.जगदीश बुकतरे होते. स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशूविज्ञान संस्था,अकोला या संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.धनंजय दिघे, सहायक आयुक्त डॉ. नम्रता वाघमारे, मानवाधिकार व सामाजिक न्याय तज्ज्ञ प्रा.छाया अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महिला व्याख्याते यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी महिलांना देवयानी अरबट यांनी महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या व त्यावरील उपाय, दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्व या विषयावर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.स्नेहल टाले यांनी रक्तदानाचे महत्व, सर्व वयोगटाच्या मुली व स्त्रियांकरिता आवश्यक करावयाच्या चाचण्या या विषयावर, अॅड.सारिका घिरणीकर यांनी महिलांचे हक्क, कर्तव्य,अधिकार व जबाबदार्या, कौटुंबिक हिंसाचार कायदा, वारसा हक्क या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले .
उपस्थित पशुपालक महिला यांनी पशुसंवर्धनाची यशोगाथा सांगून मनोगत व्यक्त केले.लम्पि चर्म रोग प्रादुर्भाव परिस्थितीत अहोरात्र सेवा देणार्या पशुवैद्यक विद्यार्थीनींना प्रशस्ती पत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.त्याचप्रमाणे आम्रपाली वाहुरवाघ या महिलेस शिलाई यंत्र देण्यात आले. या कार्यक्रमास सहयोगी प्राध्यापक डॉ.प्राजक्ता कुरळकर,डॉ.फनी फर्हीन,पशुधन पर्यवेक्षक सौ.नयना मोरखाडे, पशुधन विकास अधिकारी डॉ.साक्षी चवरे, लेखाधिकारी सौ.संचयिका सरोदे, अधीक्षक सौ. आबदे, पशुपालक सौ.घाटोळ सौ.ज्योती आगरकर, सौ.केदारे,सौ. वैष्णवी पिंजरकर व इतर महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूनम घाटे,शकुंतला दामनबोई, प्रफुल भुईभार,शशिकांत काळे ,गजानन वाघ यांनी अथक परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ.नम्रता वाघमारे यांनी संचालन डॉ. स्नेहल पाटील व डॉ.कोमल बेंद्रे यांनी केले. परिचय पशुधन विकास अधिकारी डॉ.अस्मिता देशपांडे , डॉ. वर्षा चोपडे तर आभारप्रदर्शन सौ.संगीता मनवर यांनी केले.