मुंबई६सप्टेंबर:-परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मर्जीतील परिवहन विभागाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांची ईडीने ६सप्टेंबर रोजी सकाळी १२वाजल्यापासून रात्री ८वाजेपर्यंत चौकशी केली. अखेर ८ तासांच्या चौकशीनंतर बजरंग खरमाटे यांना ईडीच्या कार्यालयातून बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान ईडीच्या चौकशी पथकाने खरमाटे यांच्या मोबाईलची सुद्धा चाचपनी केली आहे. आजच्या चौकशी दरम्यान ईडीच्या हातात काय महत्त्वाचे पुरावे लागले हे अजून गुलदस्त्यात आहे. चौकशीला बराच वेळ लागल्याने,बजरंग खरमाटेंना अटक करण्यात येते की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र त्यांना ईडीच्या कार्यालयातून उशिरा सोडण्यात आल्याने त्यांच्या अटक होण्याच्या प्रश्नांवर पडदा पडला असला तरी, अजून त्यांच्या अडचणी सुटल्या असतील याची शक्यता कमीच आहे. बजरंग खरमाटे यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात येत असून चौकशी सुरु आहे. खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मर्जीतील अधिकारी असल्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ मोठा होण्याची शक्यता वर्तवली जातआहे.बजरंग खरमाटे यांच्या चौकशी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी,त्यांच्या पत्नी, मुलगा आणि ते वापरत असलेल्या अशा एकूण चारही मोबाईल फोनची सुद्धा तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.यापूर्वी ईडीने सांगली येथील त्यांच्या घरातून, नागपूर आणि मुंबई येथून काही महत्त्वाचे दस्ताऐवज ताब्यात घेतले होते.त्याच संदर्भात आज खरमाटे यांना चौकशी साठी बोलावण्यात आले होते, परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर परिवहन विभागातील अधिकारी यांच्या बदली आणि पोस्टिंगमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप एका निलंबित अधिकारी यांनी केला होता.याच संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सुद्धा चौकशी साठीची नोटीस बजावली होती, परंतु त्यांच्या वकिलांनी चौकशी साठी हजर राहण्यासाठी १४दिवसाचा अवधी मागितला असल्याने, ते चौकशी साठी हजर राहिले नाही.आज करण्यात आलेल्या चौकशीत ईडीने त्याच्या संपत्तीबाबत तसेच परिवहन विभागात झालेल्या बदल्याच्या आर्थिक व्यवहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. तर किरीट सोमय्या यांनी बजरंग खरमाटे यांची सांगली येथील तासगाव येथे २७० कोटीं रुपयांची मालमत्ता असल्याचा आरोप करीत,त्या मालमते बाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.