ताज्या बातम्या महाराष्ट्र

पनवेल महापालिका विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून “आंतरराष्ट्रीय पोष्टिवक तृणधान्य वर्ष” साजरे करणार

पनवेल: आपल्या शरीराला संतुलित आहाराची गरज असते. बदलत्या काळामध्ये संतुलित आहारासाठी तृणधान्याचे आहरातील महत्व आणि फायदे मोठे आहेत. सर्वसामान्यांना आहारामधील तृणधान्याचे महत्व पटवून देण्याकरिता याची लोकचळवळ उभा राहिली पाहिजे.

जनमाणसांमध्ये ही चळवळ रूजविण्यासाठी पनवेल महानगरपालिका पुढाकार घेणार आहे, असे प्रतिपादन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले. पनवेल महानगरपालिका आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून‘आंतरराष्ट्रीय पोष्टेिक तृणधान्य वर्ष` साजरे करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन व आराखडा निश्चित करण्यासाठी कृती दलाची बैठक आज(14 मार्च) मुख्यालयात आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुधन विकास अधिकारी डॉ. बी.एन.गीते, जिल्हा कृषी अधिक्षक बालाजी ताठे, श्री. जायभये कृषी अधिकारी तानाजी घोरपडे,आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार, अन्न व औषधे प्रशासन सहाय्यक आयुक्त मा.रा. घोसलग, श्री.दराडे ,डेनएनयुएलएमच्या विनया म्हात्रे, वैद्यकिय अधिकारी डॉद्य अनमोल ठाकूरआदि मान्यवर उपस्थित होते. भारताचे माननीय पंतप्रधान, श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पोष्टितक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.

त्यामुळे 2023 हे वर्ष जागतिक स्तरावर “आंतरराष्ट्रीय पोष्टितक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रात देखील हे अभियान राबविले जाणार आहे. पनवेल महानगरपालिका आणि कृषी विभाग यांच्या संलग्न विभागांच्या समन्वयाने कार्यक्रम नियोजन आराखडा निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

तृणधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून यामध्ये तंतूमय पदार्थ ,खनिजे ,जीवनसत्वे भरपूर असतात. रोगप्रतिबंधक शक्ती वाढविणारी ही तृणधान्ये असतात. तसेच कमी पाण्यावर येणारी ही तृणधान्ये असतात. हवामान बदलास अनुकूल अशी ही पिके असतात. अशी माहिती यावेळी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या बचत गटांच्या महिला या उपक्रमामध्ये सामील करून तृणधन्यापासून विविध पदार्थांचे प्रशिक्षण देणे, जाहिरतीसह विविध उपक्रम राबविणे, पालिकेच्या विविध विभागाचा सक्रिय सहभाग या उपक्रमामध्ये असणार आहे. विविध उपक्रम राबविण्यावरती यावेळी चर्चा करण्यात आली.