pension-promotion
यवतमाळ

पदोन्नती व जुनी पेन्शनसाठी कास्ट्राईब संघटना आक्रमक

यवतमाळ : येथील आझाद मैदान येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने दि. २४ फेब्रुवारी रोजी विविध मागण्या करता धरणे आंदोलन करण्यात आले.

बहुजन कर्मचार्‍यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात यावी व २००५ नंतरच्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघतर्फे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या २४ रोजी लोकशाही की पेशवाई ? असा जाब विचारत शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या चे अध्यक्ष ?ड.कृष्णा इंगळे यांनी घेतला.

महासंघाचे राज्याध्यक्ष ?ड.कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये महासंघाचे विभागीय अध्यक्ष नामदेव थुल व जिल्हाध्यक्ष आनंद भगत यांचे नेतृत्वात हे जिल्हाधिकारी कार्यालय समोर(आझाद मैदान) येथे आंदोलन करण्यात आले. शासनाने २०१७ पासून शासकीय सेवेतील मागासवर्गीय कर्मचारी पदोत्रती बंद केली आहे. मागासवर्गीय कर्मचान्यांची आरक्षणमधील पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने बहुजनांची पदोन्नती रोखता येणार नाही. असे स्पष्ट निर्देश २०१८ ला राज्य शासनाला देऊनही शासनाने अद्यापही पदोन्नतीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे शासनाप्रती कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.

तसेच मागासवर्गीयांच्या अनुशेष जवळपास ३ लाख ४० हजार एवढया मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे आणि पदोत्रतीमधील आरक्षण १ लाख १५ हजार पदोत्रती देणे प्रलंबित आहे. जुनी पेन्शन योजना इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही तात्काळ लागू करावी. २००४ पूर्वी जुन्या पेन्शन योजने अंतर्गत कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळायचे. ही पेन्शन कर्मचार्‍यांच्या निवृत्तीच्या वेळेच्या पगारावर आधारित होती. या योजनेंतर्गत सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनाही पेन्शन देण्याची तरतूद होती. सरकारने एप्रिल २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचार्‍यांची जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. त्याच्या जागी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना नवीन कर्मचान्यांसाठी अन्यायकारक आहे. जुन्या कर्मचान्यांप्रमाणे २००५ नंतरच्याही कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आहे. तसेच परिचर, वाहन चालक व विविध कंत्राटी पदांची भरती न करता पूर्वीप्रमाणे बिंदूनामावलीचा अवलंब करून शासनाने नियमित नोकर भरती करावी या व इतर मागण्यासाठी कास्ट्राईब तर्फे लोकशाही की पेशवाई? या मथळ्याखाली प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनामध्ये नामदेव थुल विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ विभाग अमरावती, राजेंद्र वाघमारे,किरण मानकर, आनंद भगत जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यवतमाळ, अतुल ईडपाते,तुषार आत्राम जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना यवतमाळ, स्वप्नील फुलमाळी , रितेश भगत , भारत भितकर , अनिल डोंगरे , विनोद कांबळे , प्रफुल्ल मनवर , दिपक मुंडे,राजेश गुजर,हरीश रामटेके, वनमला राऊत,अविनाश वाकोडे , उत्तम थुल , विजय तायडे, इत्यादी महासंघाअंतर्गत काम करणाया केडर संघटणांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी या आंदोलनामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कास्ट्राईब च्या सर्व पदाधिकारर्‍यांनी सहभाग नोंदविला होता. या आंदोलनात शेकडो कर्मचार्‍यांनी उपस्थिती होती.