मुंबई१३ऑगस्ट:-न्यूज डेस्क:-मुंबई पत्नी सोबत तिच्या मर्जीशिवाय शारिरीक संबंध कायदेशीरच अशी टिप्पणी आरोपी पतीला जामीन देतांना मुंबई सत्र न्यायालयाने केली. याबाबत सविस्तर माहिती कशी आहे की, मुंबई मधील रहिवासी असलेल्या एका महिलेने तिचे नोव्हेंबर२०२०मध्ये तीचे लग्न झाले होते, लग्न झाल्यावर काही दिवसांनी,तसेच दरम्यानच्या काळात पतीने सुद्धा तिच्यावर निरनिराळ्या प्रकारचे बंधने घालण्यात सुरवात केली होती. तिच्या सासरच्या मंडळीने वेगवेगळ्या मुद्द्यांवर तिचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरवात केली होती.अशातच लग्नाच्या एक महिन्याच्या आत ते शारीरिक संबंध ठेवण्यासाठी इच्छुक नसतांना, तिच्या पतीने जानेवारी२०२१ रोजी महाबळेश्वर येथे नेऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्यावेळी तीला अस्वस्थ वाटू लागल्याने ती उपचारासाठी डॉक्टर कडे गेल्यावर तिच्या कमरेखाली लखवा मारल्याचे डॉक्टरांनी तीला सांगितले. अशा प्रकारची तक्रार तीने दाखल केली होती,नमुद तक्रारीवरून पतीच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता.त्या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी पतीने मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. तक्राररी मध्ये पीडित पतीने हुंडा मागण्याचा उल्लेख केला होता.यावर जिल्हा सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी आरोपीला जामीन देतांना तक्रारीमध्ये हुंडा किती मागितला जबर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले हे कायदेशीर चौकशीच प्रकरण नाही,असं म्हणत आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.