पुण्यातील गुन्हेगाराची आलेख वाढल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
पुणे १७ ऑक्टोबर:-पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत येत असलेल्या वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत,२३सप्टेंबर रोजी चारित्र्यावर संशय घेत,पत्नीची हत्त्या करणाऱ्या, नवरोबला एक महिन्याच्या कालावधीनंतर वाकड पोलिसांना यश आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीत येत असलेल्या, वाकड पोलीस ठाण्यातील थेरगाव मधील३८वर्षीय सुनीता जाधव ची हत्त्या झाली होती, ही हत्त्या तिच्या पतीने केली, हे पोलीस तपासात समोर आले होते.आरोपी बाळासाहेब जाधव हा हत्त्या झाली त्या दिवसांपासून फरार झाला होता.पोलिसांनी घटना घडली त्या दिवसांपासून तपासाचा वेग वाढवीत, आरोपी बाळासाहेब जाधव याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीत येत असलेल्या भोसरीतील धावडे वस्तीत राहणाऱ्या कलावती धोंडिबा सुरवार या महिलेची अज्ञात व्यक्तीने रात्री हत्त्या केली होती,एकंदरीत, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. बलात्कार, सामूहिक बलात्कार, खून आणि गँगवॉरच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात सप्टेंबर महिन्यात दहा दिवसांच्या कालावधीतच हत्येच्या तब्बल आठ घटना समोर आल्या आल्याने,पुण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पण पोलिसांना या घटनांचं खरंच गांभीर्य आहे का? हा चिंतनाचा भाग आहे. कारण या घटनांवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अजब दावा केला होता.जोपर्यंत भर चौकात खून होत नाहीत, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, असा दावा त्यांनी गेल्या महिन्यात केला होता. कृष्ण प्रकाश यांची दबंग पोलीस अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.