क्राईम

 पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्यातुन, शरीर सुखाची मागणी केल्याने यमसदनी पाठविले! 

मुंबई७ सप्टेंबर:-नवी मुंबई परिसरात येत असलेल्या उलवे येथे,एका८०वर्षीय  व्यक्तीने एका किराणा दुकान चालविणाऱ्या दुकानदाराच्या पत्नीला शरीर सुखाची मागणी केल्याने संतप्त झालेल्या दुकानदाराने ८०वर्षीय व्यक्तीला यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई येथील उलवे परिसरात घडली.रमाकांत तुकाराम नाईक असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नांव असून,ज्याने हत्त्या केली, त्याचे मोहन चौधरी असे नांव असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की,८०वर्षीय रमाकांत तुकाराम नाईक हे आर्थिक दृष्ट्या सदन असून, मोहन चौधरी दुकानदार हा याच परिसरात किराणा दुकान चालवितो. एका दैनिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार मोहन चौधरी यांच्या दुकानात२९ऑगस्ट रोजी येऊन मृतक रमाकांत तुकाराम नाईक यांनी मोहन चौधरी याला, तुझ्या पत्नीला माझ्याकडे  शारीरिक संबंध करण्यासाठी पाठव, त्याच्या मोबदल्यात तुला१०हजार रुपये देईल,तुझ्या पत्नीला हिना चौधरी यांना भेटण्यासाठी गोडाऊन वर पाठवअसे म्हटले, या कृत्याचा किराणा दुकानदार मोहन चौधरी याला राग आल्याने,त्याने रमाकांत नाईक यांना जोराचा धक्का दिला, त्यामुळे नाईक यांचे डोके टेबलावर आदळल्याने नाईक जमिनीवर पडले.त्यानंतर मोहन चौधरीने दुकान बंद करून, रमाकांत नाईक यांची गळा आवळून हत्त्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.दरम्यान, शमाकांत तुकाराम नाईक यांचा मुलगा शेखर याने वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती. सुरुवातीला पोलिसांना संशय होता की मालमत्तेच्या वादातून नाईकची हत्या झाली आहे. दरम्यान, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये चौधरी 31 ऑगस्ट रोजी आपल्या दुचाकीच्या मागे बेडशीटमध्ये गुंडाळलेले काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसून आले. चौकशीनंतर तो मारेकरी मोहन चौधरी असल्याचे उघड झाले, असे पोलिसांनी सांगितले.