नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) मेघालय आणि नागालँडच्या तरुण मतदारांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे- ‘मी मेघालय आणि नागालँडच्या लोकांना, विशेषत: तरुणांना आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना आज विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो.’
Urging the people of Meghalaya and Nagaland, particularly the young and first time voters, to vote in record numbers today.
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023
नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान सुरू झाले आहे.
मेघालय विधानसभा निवडणुकीत लवकर मतदानाला प्रोत्साहन दिल्याबद्दल पहिल्या पाच मतदारांचा सत्कार करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी जनतेला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.