अकोला : न्यू महसूल कॉलनी खडकी येथे नुकतेच नवीन वास्तूमध्ये वास्तव्यास आलेले मनोहर पुंजाजी डोंगरे यांचा सुपुत्र रुपेश डोंगरे भारतीय सैन्य दलामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये देशाची सेवा करत असल्याबाबत से.नि. तहसीलदार आत्माराम तेलगोटे यांच्या अध्यक्षतेमध्ये सामूहिकरित्या रुपेश डोंगरे व सौ. प्रियंका डोंगरे या दाम्पत्याचा पंचशिल मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ व पुष्पमाला देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सर्व प्रथम महापुरुषांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले, त्रिशरण-पंचशिल श्रवण केल्यानंतर भारतीय जवानाचे माता-पिता सदैव सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले मनोहर पुंजाजी डोंगरे व सौ. प्रमिला डोंगरे यांचा देखिल मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सत्कार कार्यक्रमाला वासुदेवराव चक्रनारायण, आत्माराम तेलगोटे, रामराव सं. खंडारे, दादाराव वाहुरवाघ, ज्ञानदेव खंडारे, ओ. आर. चक्रे, पंजाबराव वर, एकनाथ शिरसाट, एकनाथजी सिरसाट, अॅड. विजय बा. वानखडे, अॅड. अमोल चक्रे, अॅड. एकनाथ चक्रनारायण, डिगांबर वाकोडे, समाधान जामनिक, अॅड. प्रज्ञा चक्रनारायण, भारतजी ठोंबरे, मनोहर पुं. डोंगरे प्रमोद इंगळे, सुभाष कि. इंगळे, चारुशिला इंगळे, विमलताई खंडारे, विमलताई सोनोने, वर्षा विनोद फुलझेले, मायाताई तायडे, कु. एंजल व कु. ऋषिता डोंगरे इत्यादी निष्ठावान बुद्ध अनुयायी उपस्थित होते. सत्कार कार्यक्रमाचे संचालन पंजाबराव वर यांनी तर आभार प्रदर्शन ओरा चक्रे सर यांनी मानले.