सातारा२६ऑगस्ट:-सहा महिन्यांपूर्वी पतीचं अपघातात निधन झाल्यामुळे,एका जन्मदात्या आईने स्वतःच्या दोन मुलांची हत्त्या केल्याची घटना, सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली. दोन मुलांची हत्त्या केल्यानंतर या महिलेने विष प्राशन करून,आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने ती बचावली आहे.पोलीस सूत्रांच्या नुसार,कराड शहरातील एका महिलेनं आपल्या दोन पोटच्या लेकरांची हत्त्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर महिलेनं स्वतः ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण सुदैवानं संबंधित महिला बचावली असून तिची प्रकृती गंभीर आहे. कराडातील एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना कराड शहरातील आहे. येथील एका 35 वर्षीय महिलेनं आपल्या पोटच्या लेकरांची गळा आवळून हत्या केली आहे. तिनं सर्वप्रथम आपल्या 6 आणि 9 वर्षाच्या मुलांची हत्या करून स्वत: ही विष प्राशन केलं होतं. पण संबंधित महिला बचावली असून तिच्यावर कराडातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोटच्या मुलांच्या दुहेरी हत्याकांडानं परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत असताना पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे. संबंधित महिलेनं नैराश्यातून हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे. या सुसाईड नोटमध्ये तिनं आत्महत्येचं आणि लेकरांची हत्या करण्यामागचं कारणही नमूद केलं आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या आशयानुसार, संबंधित महिलेच्या पतीचं सहा महिन्यांपूर्वी एका अपघातात निधन झालं होतं. एकाकी पतीनं अशाप्रकारे जगाचा निरोप घेतल्यानं संबंधित महिला हताश झाली होती. मन खचल्यामुळे मागील काही काळापासून तिला नैराश्य आलं होतं. यातूनच तिने आपल्या दोन्ही मुलांची हत्या करून स्वत: ही आत्महत्या टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास कराड पोलीस करीत आहेत.