ताज्या बातम्या देश

नीट-पीजी2023 परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम्स इन मेडिकल सायन्सेसकडून (एनबीईएमएस) नीट-पीजी 2023 परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विट करून निकाल जाहीर झाला असल्याची माहिती दिली.

ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ट्विटमध्ये या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. एनबीईएमएसने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली असून परीक्षेचे आयोजन आणि निकाल यशस्वीपणे जाहीर केले असून त्यांचे कौतुक वाटत असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. नीट-पीजी 2023 या परीक्षेसाठी यावर्षी सुमारे 2.9 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या 5 मार्च 2023 रोजी नीट-पीजी 2023 ही परीक्षा पार पडली. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी एमडी/एमएस/ डीएनबी/ डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली. नीट-पीजी 2023 विद्यार्थ्यांना एनबीईएमएस चे संकेतस्थळ natboard.edu.in आणि nbe.edu.in येथे निकाल पाहता येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आपल्या निकालाची कॉपी 25 मार्च 2023 नंतर संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.