अकोला

निर्माणाधीन पुलाच्या सिमेंटप्लेट खाली दबून वृद्ध ठार 

मूर्तिजापूर,ता.२५ : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान शासकीय तंत्रनिकेतन जवळील निर्माणाधीन पुलाची सिमेंट प्लेट पडल्याने त्याखाली दबून एका वृद्धाचा आज दुपारी करूण अंत झाला.  रा

जपथ इन्फ्राकॉन कंपनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या बडनेरा ते बोरगाव दरम्यानच्या ठप्प्यातील चौपदरीकरणाचे काम करीत आहे. त्यापैकी एका पुलाचे निर्माण कार्य हेंडजच्या तंत्रनिकेतन जवळ सुरू आहे. पुलाच्या कडेला लावल्या जाणाऱ्या सिमेंटच्या प्लेटमधील एक प्लेट पडली. नेहमीप्रमाणे गुरांचा चारा आणण्याकरिता जाणारे येथील पठानपुऱ्यातील ६१ वर्षीय शेख यासिन शेख बशीर त्या प्लेटखाली दबले. या दूर्घटनेची माहिती मिळताच येथील आपातकालीन पथकातील सदस्य सेनापती सेवतकर,अमोल खंडारे,बादशहा,गणेश खंडारे,गौरव यांनी रुग्णवाहिकेतून त्यांना लगेच येथील लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालयात नेले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.