अकोला ताज्या बातम्या

नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी मोटर वाहन निरीक्षक योगिता राणे यांची मूर्तिजापूरात कारवाई

मूर्तिजापूर21 फेब्रुवारी – तालुक्यात रस्ता अपघाताला आळा घालण्यासाठी नव्याने नियुक्त झालेल्या मोटर वाहन निरीक्षक योगिता राणे यांची नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी मूर्तिजापुरात अनेक बेशिस्त वाहनधारकांना समज देऊन कारवाई
तालुक्यासह जिल्हयात रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी नुकत्याच तालुकानिहाय मोटर वाहन निरीक्षक व सहायक मोटर वाहन निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मूर्तिजापुर तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या योगीता राणे ह्या मूर्तिजापुरात कर्तव्यावर असताना शहरातील काही शाळा ,विद्यालयात जाऊन रस्ता सुरक्षेबाबत समुपदेशन केले त्यानंतर रस्ता सुरक्षा तपासणी मोहीमेवर असताना रस्त्यात एक अल्पवयीन मुलगा मोपेड गाडी चालवताना दिसून येताच त्याला थांबवून आपले सहकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून मुलाला घेऊन गाडी चालवत ग्रामीण पोलिस स्टेशनला नेण्यात आले. त्यानंतर मुलांच्या आई वडीलांना बोलावून ग्रामिणचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या उपस्थितीत मोटर वाहन निरीक्षक योगिता राणे,सहायक मोटर वाहन निरीक्षक गोपाल पंचोली,सहायक मोटर वाहन निरीक्षक लेलीन ढाले व वाहन चालक संदिप काळे यांनी मुलासह आई वडिलांना समज देऊन कारवाई करत यापुढे कोणत्याही परिस्थितीत आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुला-मुलीना वाहन चालविण्यास देऊ नये अश्या सुचना देत असताना अल्पवयीन मुल – मुली वाहन चालवताना आढळून आल्यास मुल – मुलीसह आई – वडिलांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला.