अकोला

नाभिक समाजाच्या वतीने प्रमोद पांडे यांना सन्मानित

अकोला : स्थानीक म्हाडा कॉलनी रोड संत सेना महाराज नगर खडकी येथे अकोला येथे नाभीक समाज जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दि२०/२/२०२३ करण्यात आले होते.

नाभिक समाज कार्यकर्ता मेळाव्यात नाभिक समाजातर्फे ऑनलाईन मीडिया जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष तथा ह्युमन राइट्स न्यूज चे संपादक प्रमोद पांडे यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार माजी पालकमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला व नाभीक समाजाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन गजानन वाघमारे मित्र मंडळ यांनी केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष मा.दामोदर काका बिडवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संग्रामदादा गावंडे आमदार वसंतजी खंडेलवाल, प्रमुख वक्ते मिडीया सेल प्रमुख बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्याचे विवेकदादा राऊत, डॉ.प.कु.विद्यपीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.कीशोरजी बिडवे,सं. अध्यक्ष नाभिक सेना संघ औरंगाबाद माधव भाले,मा.नगरसेवक मनपाचे पंकज गावंडे, सामाजिक कार्यकर्ता सौ कविता अरुण कडू, देऊळगाव मही बुलढाणा भाजपाचे कैलास राऊत, ओबीसी नेते डॉ.प्रा. संतोष हुशे उपस्थित होते यांच्यासह माजी उपमहापौर मनपा चे विनोद मापारी, माजी नगरसेवक विजय इंगळे, माजी नगरसेवक शारदाताई ढोरे, माजी नगरसेवक धनंजय धबाले, सामाजिक कार्यकर्ता शंकरराव लंगोटे, गजानन हुंडीवाले, सुरेंद्र हुंडीवाले, १२ बलुतेदार महासंघ अकोलाअध्यक्ष अनिल शिंदे व नाभिक समाज जिल्हा कार्यक्रमात समाजाचे कार्यकर्ता व समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले व पत्रकार, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे समाजसेवक व कविवर्य यांचा सत्कार करण्यात आला