अकोला: हमीभावाने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र नोेंदणीच्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकर्यांचे प्रचंड हाल झाले. उन्हातच शेतकर्यांना तासंतास रांगेत उभे राहून नोंदणी करावी लागली.
त्यामुळे नोंदणीच्या ठिकाणी मंडप टाकण्यासह अन्य सुविधांची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यात हरबरा खरेदी करण्यासाठीनाफेड यंत्रणेकडून खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरु करण्यात आलेले नाही.त्यामुळे नाइलाजास्तव शेतकर्यांना हरबरा खुल्या बाजारात खासगी व्यापार्यांना कमी भावात विकणे भाग पडत आहे.
शासनाकडून हरभर्यासाठी ५३३५ रुपये प्रती क्विंटल आधारभूत किंमत निश्चित केलेली असताना प्रत्यक्षात खुल्या कमी भावाने हरभरा विकावा लागत आहे. अखेर नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात ही याप्रक्रियेला प्रारंभ झाला.
यंदा खरीप हंगामात शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. पेरणीचा खर्चही िनघाला नाही. तसेच पीक विमा योजनेपासूनही बहुतांश शेतकरी वंचित आहेत. रब्बी हंगामात तरी खरीपमधील नुकसान भरून िनघेल, अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे. त्यामुळे हरभरा िवक्रीत तरी लूट होऊ नये, अशीमागणी शेतकर्यांनी केली आहे.