राजकीय

नाना पटोले, यांच्या नामनिर्देशन पत्रात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी नितीन गडकरी यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल!

 


नागपूर१०सप्टेंबर:-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर करुन, निवडणूक आयोगाची दिशाभूल केली, अशा प्रकारची याचिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या,नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांनी निवडणूक शपथ पत्रात दिशाभूल करणारी माहिती सादर केली होती. अश्या आशयाची याचिका दाखल केली होती, त्याला प्रतिउत्तर म्हणून गडकरी यांनी दाखल केलेली याचिका असल्याचे स्पष्ट होत आहे.सन२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी नागपूरमधून विजयी झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. उत्पन्नान स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले तसेच त्यांनी कायद्यातील विविध तरतूदी न नियांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे. गडकरी यांना ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारिज करुन घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम १२ (अ) अंतर्गत हा अर्ज दाखल केला आहे.या प्रकरणावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, पटोले यांनी या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी २४ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. गडकरी यांच्यावतीने वरिष्ठ अँँड. सुनील मनोहर तर पटोले यांच्यावतीने अँँड. सतीश उके यांनी बाजू मांडली.नितीन गडकरी यांनी सादर केलेल्या अर्जावर नाना पटोले येत्या२४सप्टेंबर२०२१रोजी काय स्पष्टीकरण सादर करतात, यावर पुढील सुनावणी दरम्यान न्यायालय काय निर्णय देते.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.