Patole-moghe
राजकीय

नाना पटोलेंना हटवा, शिवाजीराव मोघेंना महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष करा; विदर्भातील २४ नेत्यांची मागणा

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन नाना पटोलेंना हटवा आणि शिवाजीराव मोघेंना अध्यक्ष करा, अशी मागणी मोघे समर्थकांनी केली आहे. विदर्भातील २४ नेत्यांनी नाना पटोलेंना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. नाना पटोलेंनी प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी आणली, पक्षात दलित-मुस्लिम आणि आदिवासी यांना दूर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

त्यामुळं पुढचा प्रदेशाध्यक्ष आदिवासी समाजातून करावा, अशी मागणी पक्षाचे निरिक्षक रमेश चेन्निथला (Raसेप् ण्पहहग्ूप्aत्a) यांच्याकडे करण्यात आली आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षात गटबाजी निर्माण केली आहे. नाना पटोले यांच्यामुळेचं काँग्रेसची मुख्य व्होटबँक असलेले दलित, मुस्लीम आणि आदिवासी यांना पक्षात दूर करण्यात आले आहे.

नाना पटोले हे पक्षात मनमानी करत आहेत. आता काँग्रेसमध्ये देखील नानागिरी सुरू असल्याचा दावा शिवाजीराव मोघेंच्या समर्थकांनी केला आहे. नाना पटोले पक्षाच्या बैठकीत कुणाचंही ऐकत नाही असा गंभीर आरोप विदर्भातील २४ नेत्यांनी केला आहे.

त्यामुळं पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा आणि आदिवासी नेते शिवाजीराव मोघेंना प्रदेशध्यक्षपद करा, अशी मागणी पक्षाचे निरिक्षक रमेश चेन्निथला यांच्याकडे केली आहे. त्यामुळं आता रमेश चेन्निथला याबाबत काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस समितीचे सचिव रहमान खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंह सलूजा, इक्राम हुसैन यासोबत इतर २१ पदाधिकार्‍यांनी रमेश चेन्निथला यांची मुंबईत भेट घेतली. नाना पटोले यांना हटवण्याची मागणी करण्यासाठी हे सर्व नेते लवकरच हायकमांडला भेटण्यासाठी रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात जाणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसमधील अंतर्गत वाज चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी मिळाली असतानाही अर्ज न भरल्यानं सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. तर सत्यजीत तांबे यांनी पक्षाने उमेदवारी दिलेली नसतानाही अपक्ष अर्ज भरुन एकप्रकारे बंड पुकारलं होतं.

यावरुन नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली. तसेच बाळासाहेब थोरात नाराज असल्याचीही चर्चा सुरु झाली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन नाना पटोलेंना हटवा आणि शिवाजीराव मोघेंना अध्यक्ष करा, अशी मागणी मोघे समर्थकांनी केली आहे. विदर्भातील २४ नेत्यांनी नाना पटोलेंना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.