Nagpur-Metro-Station
नागपूर

नागपूर : मेट्रो स्टेशनवर आदिवासींची गौरवशाली परंपरा

नागपूर : नागपुरातील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान विदर्भातील आदीवासी व त्यांची गौरवशाली परंपरा दर्शविणारे देखावे आज लावण्यात आले आहेत. यामुळे या परिसरास देखणे स्वरुप प्राप्त झाले आहे.

सी-20 परिषदेसाठी नागपूर शहरात येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांना महाराष्ट्र व विदर्भाच्या समृद्ध वारश्याचे देखाव्यांच्या माध्यमातून दर्शन घडविण्यात येणार आहे. यासाठी विमानतळ ते छत्रपती चौकादरम्यानच्या तीन मेट्रोस्टेशन खाली ऐतिहासिक व सांस्कृतिक समृद्धता दर्शविणारे देखावे मांडण्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे.

सर्वप्रथम उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान आदिवासींचे लोकजीवन व समृद्ध परंपरा दर्शविणारे धातुंचे आकर्षक देखावे बुधवारी उभारण्यात आले. शहरातील छत्रपती चौक मेट्रो स्टेशन मार्गीकेच्या पीलर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा देखावा बसविण्यात येत आहे.

जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन पीलर दरम्यान पेंच अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील प्राणी, मोगली हे प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिकेतील पात्र व जैव संपदा साकारण्यात येत आहे.