महाराष्ट्र

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे७०टक्के काम पूर्ण, विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग वरदान ठरणार!

अकोला ६सप्टेंबर:- विदर्भाच्या विकासासाठी वरदान ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम ७०टक्के पूर्ण करण्यात आले असून,डिसेंबर२०२२ पर्यंत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळाने प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.समृद्धी महामार्ग निर्मिती साठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल, तसेच मिहान प्रकल्पाच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग पर्वणी ठरल्यानार असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केले आहे.नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा भारतातील पहिला आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग असून,हा महामार्ग महाराष्टाची राजधानी मुबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणारा आहे.या महामार्गामुळे मुबंई ते नागपूर फक्त८तासांत कापले जाईल, असा दावा करण्यात येत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे या सुपर एक्सप्रेस हायवेचे नांव असणार आहे. राज्यात गाजावाजा झालेल्या या महामार्ग ८लेन चा असून,या महामार्गावर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे., हा महामार्ग दहा जिल्ह्यातुन गेला असून,यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, जालना, औरंगाबाद,अहमदनगर, नासिक ठाणे आणि मुबंई यांचा समावेश आहे, परंतू या महामार्गाला महाराष्ट्रातील,चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली,हिंगोली, परभणी, नांदेड, बीड,धुळे,जळगाव, पालघर आणि रायगड हे जिल्हे अप्रत्यक्ष या महामार्गाला जोडले जाणार आहेत. या महामार्गाशी२६तालुके आणि ३९२गावांचा प्रत्यक्ष संबंध येणार आहे.समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी८६१हेक्टर जमीन संपादित केली असून, त्यासाठी७४०६कोटी रुपयांचा मोबदला जमीन धारकांना देण्यात आला आहे. या समृद्धी महामार्गाची किंमत २०१५मध्ये मंजुरीच्या वेळी४०हजार कोटी रुपये होती,ती वाढून आजच्या घडीला६०हजार कोटींच्या घरात गेली आहे.या महामार्गाच्या निर्मितीसाठी १६पॅकेज निश्चित करण्यात आले आहेत.समृद्धी महामार्ग होण्यासाठी१९९५ साला पासून राज्य सरकार मध्ये चर्चा सुरू होती.,शेवटी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना,केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वकांक्षी प्रकल्पाला ७ सप्टेंबर२०१६ रोजी अधिसूचना काढण्यात आली. समृद्धी एक्सप्रेस-वेची रुंदी१२०मीटर असून,एका बाजूला४लेन आणि दुसऱ्या बाजूला ४लेन अशा ८लेन या महामार्गावर असणार आहेत. प्रत्येक१००फुटावर रोड डिव्हाडर असून,या महामार्गावर विमान इमरजेंंशी लँडिंग सुद्धा करू शकेल, अशा पद्धतीने समृद्धीची निर्मिती करण्यात आली आहे. या मार्गावरील७२टक्के उड्डाण पुलाचे काम अजून पर्यंत अपूर्ण आहे,त्याचप्रमाणे५१मोठ्या पुलाचे काम शिल्लक आहे, तर ८५टक्के भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाच्या एकूण स्ट्रक्चरची लांबी१,८५०किलोमीटर असून, त्यापैकी१,४०५किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर एकूण३१मोठे पूल,असून त्यापैकी१३पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दोन मोठे पूल आणि चार उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या महामार्गावर२४इंटरचेंजेस २इंटरचेंजेसचे काम पूर्ण झाले आहे,४इंटरचेंजेसचे काम प्रगती पथावर असून,१७इंटर चॅनजेच्या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झाली नाही. या महामार्गात एकूण सहा बोगदे असून, त्या बोगद्याचे पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. हा महामार्ग तयार करतांना पर्यावरण आणि वन्यजीव यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीव प्राणी यांचा वावर असलेल्या ठिकाणी, त्यांच्या साठी सुरक्षित अशी व्यवस्था केली आहे. या महामार्गावर एकूण६१उड्डाण पूल असून१९पुलाचे काम पूर्ण झाले असून,४६पुलाचे काम प्रगती पथावर आहे,सुपर एक्सप्रेस वेवर मोठे पूल३९असून,१३पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून,१६पुलाचे काम प्रगती पथावर आहे. या महामार्गावर एकूण८रेल्वे ब्रिज आहेत,२ पुलाचे काम पूर्ण करण्यात आलं असून, उर्वरित कामे वेगाने सुरु आहेत. या महामार्गावर छोट्या पुलांची संख्या३०२इतकी असून,२१०पुलाचे काम पूर्णत्वास गेले असून,६०पुलाचे काम प्रगती पथावर आहे. या ३०२पुलांपैकी२०कॅनॉल पूल आहेत, त्यापैकी१९ पूर्ण झाले असून, एका पुलाच काम अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गाच्या दरम्यान७४८मोरी पुल असून,त्यापैकी६५८पूर्ण करण्यात आली आहेत,३७मोरी पुलाचे काम प्रगती पथावर आहेत.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर एकूण ६बोगदे असून, एकाही बोगद्याचे काम पूर्ण झाले नसले तरी,या बोगद्याचे ही कामे वेळेत केले जातील, असा दावा राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

मुंबई नागपूर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर, एकूण ६ बोगदे असून, यातील सर्वात मोठा ८किलोमीटरचा बोगदा हा औरंगाबाद जिल्ह्यात असणार आहे.या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर८तासात कापले जाईल, तसेच समृद्धी महामार्गावर वाहने ताशी१५०किलोमीटर वेगाने धावतील असा दावा, तज्ज्ञांनी केला आहे.