उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधपरिषदेत ग्वाही
मुंबई : मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या विविध बांधकामांमुळे अपघात होऊन निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये यासाठी कार्यपद्धती ठरविण्यासाठी राज्यसरकारकडून तज्ञाची स्वतंत्र कमिटी स्थापन करून एसओपी जाहीर करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीवर उत्तर देतांना दिली. मुंबईतील वरळी येथील फोर सिझन रेसिडेन्शील या इमारतीचे बांधकाम सुरु असतानाच दोन पादचाऱ्यांच्या डोक्यावर सिपोरेक्स बॉक्स पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात सदस्य सुनील शिंदे यांनी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर ते बोलत होते. विधान परिषद सभापती नीलम गोर्हे यांनी आता रस्त्यावरून जाताना लोकांनी आता हेल्मेट घालून जावे का ? त्यामुळे हा खटला फास्ट ट्रक कोर्टात देण्याचे निर्देश राज्यसरकारला दिले.
लक्षवेधीवर बोलताना सदस्य सुनील शिंदे म्हणाले कि, विकासकाकडून कोणत्याही सुरक्षा विषयक उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत . मात्र दुर्घटना झाल्यानंतर मूळमालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अप्रोच रॉड नसतानाही ६४ मजली इमारतीचे काम सुरु आहे. विकासक आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे दोघांना नाहक जीव जमाव अलंगला आहे. या इमारतीला पार्ट ओसी देण्यात आली असतानाही टेरेसवर हॉटेल बांधण्यात येत आहे याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सदस्य सचिन आहीर यांनी मेट्रो मोनो यांच्यासह मोठमोठ्या कॅन्स्ट्रक्शनची कामे सुरु आहेत. अनेक बांधकामांमुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहेत त्यामुळे मुंबईसह राज्यात याविषयी सरकारने एक धोरण जाहीर करण्यासाठी कमिटी स्थापन करण्याची मागणी अहिर यांनी केली.
उद्यागमंत्री सामंत म्हणाले कि, या दुर्घटनेप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या दाव्यात मुंबई उच्च न्यायालयाने तज्ज्ञाची कमिटी नेमून त्या कमिटीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील एकूणच बांधकामासाठी ठरविण्यासाठी एक समिती गठीत करून एसओपी स्थापन करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.