Yoga day
देश

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची 100 दिवसांची उलटगणना योग महोत्सवाने होणार सुरू

नवी दिल्ली : आयुष मंत्रालयाने मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या सहकार्याने दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये 13 ते 14 मार्च दरम्यान योग महोत्सव 2023 आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेमध्ये 15 मार्च रोजी महोत्सव पश्चात योग कार्यशाळा आयोजित केली आहे.

“वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वासह “एक जग, एक आरोग्य’.ही भारताच्या जी 20 अध्यक्षपदाची संकल्पना आहे , या पार्श्वभूमीवर मोठ्या जागतिक समुदायाला यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या माध्यमातून होणार आहे. जागतिक स्तरावर पोहोचण्याबरोबरच, ग्रामपंचायत/ग्रामसभांच्या सक्रिय सहभागाद्वारे योगाभ्यासाला भारतातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यावर आंतरराष्ट्रीय योग दिन लक्ष केंद्रित करेल.

केंद्रीय आयुष आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल योग महोत्सव 2023 चे उद्घाटन करतील.

योग महोत्सव 2023 हा 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 च्या 100 दिवसांच्या उलटगणनेच्या प्रारंभाच्या निमित्ताने आयोजित एक कार्यक्रम आहे.याच अनुषंगाने , या वर्षी, योगाभ्यासाच्या विविध पैलूंचा आणि त्याच्या उपयुक्ततेचा व्यापक प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तसेच जगभरात आरोग्य, निरामयता आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनें लोक चळवळ सुरु करण्यासाठी योग महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली एनसीआरमध्ये 100 ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिके/ सत्रांच्या माध्यमातून उलटगणना सुरु होईल आणि याद्वारे 100 दिवस, 100 शहरे आणि 100 संस्थांचे देशभरातील उपक्रम सुरू होतील.

यावर्षी योग महोत्सवात अंगणवाडी सेविका/आशा कार्यकर्त्या /बचतगट , आयुष आरोग्य आणि निरामयता केंद्रे , निवासी कल्याण संघटना (आरडब्ल्यूए ), महिला कल्याण संस्था, पदव्युत्तर विभाग/विद्यापीठ/योग विद्यापीठे/योग महाविद्यालये आणि संस्था/आयुर्वेद, सिद्ध होमिओपॅथी आणि युनानी महाविद्यालय / निसर्गोपचार आणि योग महाविद्यालये, शाळा, संशोधन परिषद/राष्ट्रीय संस्था/ एनआयएसएम /एनसीएच /पीसीआयएम अँड एच /एनएमपीबी आणि इतर संस्थांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळेल.