अकोला

नगर परिषद कर्मचार्‍यांच्या संपाला वंचितच्या पदाधिकारी यांचा पाठिंबा

अकोट: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रमुख मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी संप दिनांक १४ मार्चपासून पुकारला असून या संपात संपूर्ण अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी सफाई कामगार यासंबंधीत सर्व संघटना या संपात सहभागी झालेले आहेत.

संपाच्या दुसर्‍या दिवशी सुद्धा कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सर्व कर्मचार्‍यांनी संप सुरू ठेवलेला आहे. कर्मचार्‍यांच्या मागण्या संदर्भात दुसर्‍या दिवशी शहरातील विविध नामवंत व्यक्तींनी सभा मंडपाला भेट देऊन कर्मचार्‍यांचे संपाला पाठिंबा दर्शविलेला आहे. यामध्ये तालुकाध्यक्ष चरण इंगळे महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र औईंब, सुभाष तेलगोटे,सदानंद तेलगोटे,रामकृष्ण मिसाळ,सिद्धेश्वर बेराड,आकाश सोनोने,अमोल सोनोने,रवि तेलगोटे,भिमराव सोनोने यांच्यासह वंचितच्या पदाअधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा नोंदवला आहे.