ताज्या बातम्या

नखेगाव पिलकवाडी रस्ता बनला जिवघेणा!

स्वप्नील सरकटे
अकोट३०सप्टेंबर:-अकोट तालुक्यातील नखेगाव पिलकवाडी हा डांबरीकरणाचा रस्ता सिमेंट काँक्रेट चा रस्ता खडीकरण्याचा रस्ता असे अनेक रस्ते आपण बघितले असतील परंतु चक्क चिखलाचा रस्ता आहे, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही मात्र नखेगाव पिलकवाडी या रस्त्याची पाहणी केल्यास हा रस्ता संपूर्ण चिखलामय असून यामुळे या परिसरात नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहे. अकोट तालुक्यातील असलेले मौजे नखेगाव पिलकवाडी या रस्त्याची चिखलमय अवस्था पाहता येथील नागरिक हे चिखलाच्या या रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत या रस्त्यावरून कुठलेही वाहन चालविणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालने आहे, वाहन चालवितांना वाहन धारकास जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागतं आहे कारण रस्ता हा संपूर्ण उखडून गेला असून काही दिवसापूर्वी रस्त्यावर खड्डयामध्ये मुरूम टाकण्यात आला परंतु दुर्दैवाने मुरमा मध्ये मातीचे प्रमाण अधिका-अधिक झाल्यामुळे रस्ता चिखलामय झाला आहे, अशा रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे आहे येथील ग्रामस्थांना ये जा करण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे. संबंधित अधिकारी यांना समस्त नागरिक विनंती करत आहे की वरील समस्या सोडवाव्या व समस्त ग्रामस्थांची या त्रासापासून मुक्तता करावी, अशी मागणी या परिसरातील वाहन धारक तसेच नागरिकांकडून केली जात आहे .
आंदोलन करावेच लागेल नखेगाव पिलकवाडी या रस्त्याची चिखलमय अवस्था पाहता हा रस्ता जीवघेणा बनला आहे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वेळप्रसंगी ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल-हर्षल ठाकरे पिलकवाडी वाहनधारक