क्राईम

धोत्रा शिंदे येथे दोन गटात हाणामारी; ३ गंभीर तर १० जण किरकोळ जखमी

 अजय प्रभे,तालुका प्रतिनिधी,

मूर्तिजापूर,१२ऑगस्ट : तालुक्यातील धोत्रा शिंदे गावात क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारामारीत १३ जण जखमी झाले असून त्यापैकी तिघे अत्यवस्थ आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की,वर्षभरापूर्वी विवाह होऊन धोत्रा गावात आलेल्या अमरावतीच्या विवाहितेसह सासरच्या मंडळीचा कौटुंबिक वाद सुरू होता. यासंदर्भात समजूत घालण्यासाठी अमरावतीवरुन काही जण धोत्रा येथे आले होते. विकोपाला गेलेल्या वादाचे पर्यवसान दोन गटातील हाणामारीत झाले. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले,तर १० जण किरकोळ जखमी झाले. शेख तालीफ शेख कुदरत (४५) राहणार धोत्रा, शेख मुस्ताक शेख तानीफ (२५) धोत्रा, साजीद खान मोहम्मद खान (१८) राहणार अमरावती हे गंभीर जखमी झाले असून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उपचारासाठी अकोला व अमरावती येथे हलविण्यात आले. शेख इर्शाद अ. नसीरुद्दीन (२७) राहणार माना, शे. इर्शाद शे. मुंगी (३२), अ. खलील अ. सलील (४०), नजरोद्दीन शे. तानीफ (५०), मुस्कान परवीन शेख मुस्ताक (२५), शे. तानीफ शे. कुदरत (४५), शे. मुस्ताक शे. तानीफ (२५) सर्व राहणार धोत्रा शिंदे, व महेबूब खान अजीज खान (४५), रशीद खान महेबूब खान (२४) नसरीन परवीन महेबूब खान (४०) तिघेही राहणार अमरावती हे किरकोळ जखमी झाले आहेत जखमींवर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी काल रात्री मध्यरात्रीनंतर अंजूम शेख मुश्ताक(१९) रा. अमरावती व शेख मुश्तफा शेख तानीफ (२६)रा.धोत्रा यांच्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून भादंविच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत दोन्ही बाजुंकडील ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस  उपनिरिक्षक मानकर, हेकाँ तेजराव तायडे, नारायण आवणकर, गजानन सयाम, रितेश मड्डी करीत आहेत.