अकोला

दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात तिघांचा मृत्यू तर एक गंभीर पती-पत्नीसह २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

अकोट: दोन मोटरसायकलमध्ये समोरा-समोर धड़क होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोट अंजनगाव रस्त्यावरील वाई फाट्याजवळ आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दरम्यान या अपघातामध्ये दोन्ही मोटरसायकलवर स्वार असलेल्या व्यक्तींमध्ये पती-पत्नीचा आणि २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटने संदर्भात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अकोट अंजनगाव रस्त्यावर आज दुपारी एक वाजता सुमारास एमएच २७ बीयू ४३९७ आणि एमएच २७ एस ८४६८ (अंदाजे) या क्रमाकांच्या मोटरसायकलमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

यामध्ये पती-पत्नीचा व दुसर्‍या दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही मोटरसायकलचा अक्षरशः चुरडा झालाय. अपघातानंतर लागलीच रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी तसेच ऑटो चालकांनी जखमींना तातडीने आकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र यातील तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले असून यासंदर्भात अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अकोट तालुक्यातील पणज येथील विनय गवळी यांचा उद्या विवाह पार पडणार असून आज नानमुखाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अकोट येथील मंजुळकर दाम्पत्य हजेरी राहण्यासाठी आपल्या दुचाकीनं निघालं होतं. मात्र वाटतच त्यांचा दुचाकीचा भीषण अपघात झाला. अकोट अंजनगांव रस्त्यावरील वाई फाट्याजवळ अंजनगाव कडून येणार्‍या दुचाकीला त्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात मंजुळकर कुटुंबातील म्हणजे दुचाकीस्वार असलेली पत्नी पत्नीचा मृत्यू झाला आहे.

संजय रामदास मंजुळकर व शोभा संजय मंजुळकर असं मृत पती-पत्नीचे नाव आहे. तर अंजनगाव कडून येणार्‍या दुचाकी वरील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रणय हरिदास घट्टे (वय २४, राहणार अंजनगांव, जि. अमरावती.) असं मृतक तरुणाचं नाव आहे आणि पंकज बेलसरे असं जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. सद्यस्थितीत अपघातात जखमी असलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहे. पणज येथील ऑटो चालक विट्ठल सुलताने, मयूर महाले, दिलीप करहाळे तसेच परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.