देश

देश विभागनीचे दुःख विसरणे अशक्य-पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली,१४ऑगस्ट:-

  • १४ऑगस्ट १९४७ रोजी देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तान नावाने,जगाच्या नकाशावर एका नवीन देशाचा जन्म झाला. या विभागनी मध्ये हजारो लोकांचा बळी गेला.हजारो लोकांना आपआपले घरदार सोडून,उघड्यावर विस्थापित व्हावं लागलं,देश फाळणीच्या या आठवणीने पंतप्रधान नरेन्द्र मोदी अगदी भावुक झाले,यावेळी मोदींनी यावेळी देश विभागनीचे दुःख विसरणे अशक्य असल्याची भावना व्यक्त केली.पंतप्रधान यांनी१४ऑगस्ट फाळणीच्या वेदना स्मरण करण्यासाठी”विभाजन विभाषिका स्मृती दिवस” म्हणून पाळण्यात येईल असं आपल्याला ट्विटर जाहीर केलं.हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य, आणि दुर्भावनेचे विष संपविण्यासाठी प्रेरणा देईल,सोबतच एकता,सामाजिक सलोखा आणि मानवी संवेदना देखील मजबूत होतील.मुस्लिम बहुल पाकिस्तान या नव्या देशाचा उदय झाला. भारत पाक फाळणी हे इतिहासात तील सर्वात मोठे विस्थापन आहे.फाळणीच्या वेदना अजूनही जिवंत आहेत.असे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले.