अकोला

देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या४आरोपींना अटक!

पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाची कारवाई!

अकोला प्रतिनिधी२२ऑक्टोबर:-अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर यांच्या पथकाने २२ऑक्टोबरच्या सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, रेल्वेगेटवर सापळा रचून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १७देशी दारूच्या पेट्यासहित, एक दुचाकी आणि एक चारचाकी मारूती वॅगन आर गाडीसह 2,लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी फेज नंबर२मधील रेल्वे गेटवरून सकाळच्या वेळी देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे २२ऑक्टोबरच्या सकाळपासून अकोला शहर पोलीस उपविभागीय अधिकारी रेल्वे गेटच्या जवळ सापळा रचला होता. त्यानंतर काही वेळाने मलकापूरच्या दिशाने एक मारुती वॅगन आर मध्ये आणि एक दुचाकीवर १७देशी दारूच्या पेट्या घेऊन येतांना ४इसम,नाकाबंदी दरम्यान मिळून आल्याने, त्यांना ताब्यात घेऊन, त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात६५(अ)(ई)महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आकाश दीपक वाघमारे, धम्माजी रामजी बलखंडे, कृष्णा राजू बागडे आणि अतुल सुधाकर बागडे,रा सर्व शिवणी, ता.जि. अकोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नमूद आरोपींकडून देशी दारू सह,दुचाकी आणि चारचाकी गाडीसह २लाख ७६०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर यांच्या पथकाने केली.या कारवाई बाबत सूत्रांकडून अधिक माहिती जाणून घेतली असता मलकापूर परिसरातील एका देशी दारूच्या दुकानातील दुकान संचालकाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना आर्थिक आमिष देण्याचा प्रयत्न करीत, दुचाकी आणि चारचाकी सोडून देण्यासाठी गळ घातली होती, परंतु विशेष पथकाच्या कर्मचाऱ्यांनी हा आदेश धुळकावीत कायदेशीर कारवाई केली.