digamber-jain
अकोला

दिगंबर जैन सैतवाल समाजाची संघटन शक्ती वाढवा- दिलीप घेवारे

अकोला: दिगंबर जैन सैतवाळ समाजाची संघटन शक्ती वाढवावी, असे आवाहन अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे यांनी केले. अकोला येथील सैतवाळ समाजाच्या सभेत ते बोलत होते. अकोला येथे अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेच्या केंद्रीय कार्यकारणीची पदाधिकारी तथा सैतवाळ समाज बांधवांची सभा अण्णासाहेब रोकडे मिलन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.

या सभेला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे मुंबई, वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन नखाते नागपूर,े महामंत्री मुकुंद वालचाळे वाशिम, प्रवक्ता पवनकुमार अंभोरे परभणी, वरिष्ठ सल्लागार विजयकुमार संगवे मुंबई, शिष्यवृत्ती समितीच्या शालिनीताई पळसापुरे मुंबई, पश्चिम विदर्भ विभागाचे विभागीय उपाध्यक्ष सुरेश दादा कहाते,विभागीय सचिव प्रमोद मानेकर, अकोला येथील पार्श्वनाथ संस्थान किल्ला मंदिर समिती अध्यक्ष रविंद्र उन्होने उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये मंगलाचरण तथा स्वागत गीत उषा बोराळकर,प्रनिता उखळकर,जया भागवत आणि महिला मंडळ व त्यांच्या संगीत मंच यांनी सादर केले.कार्यक्रमाचे संचालन सुनिता उखळकर, अकोला जिल्हाध्यक्ष प्रा.अनंत आगरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता जिनवाणी स्तुती रूपाली उनवणे,सौ.कल्याणीताई सोनोने, व महिला मंडळ यांच्या गायनाने झाली.

कार्यक्रमाचे आभार डॉ.प्रकाश कहाते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक गडेकर, विनोद उखळकर, फुलचंद बुरसे,डॉ.प्रकाश कहाते, दीपक वाडेकर संजय गडेकर, प्रदीप फुरसुले,संदीप उनवणे, दीपक कस्तुरे, राजेंद्र गिललकर, पवन मेहत्रे, अभिजीत कस्तुरे,राजेश आंबेकर,नितीन फुरसुले,रूपाली उनवणे, कल्याणी सोनोने,चैताली साखरे,प्रतिभा पंडित,कल्पना गडेकर, विमल गवारे,भारती गिल्ललकर,राजश्री कस्तुरे, रूपाली बोराळकर, अर्चना नांदेडकर, संध्या खडके,वंदना गवारे आणि सैतवाळ महिला मंडळ आदींनी प्रयत्न केले.