क्राईम

दहीहांडा पोलीसांची अवैद्य देशीदारू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई!

३३ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त

अकोट : अकोला येथुन दहीहांडा पोलीस स्टेशनच्या हंद्दित देशी दारूची डिलेवरी होत असल्याचा प्रकार कारवाई दरम्यान उघडकीस आला आहे.पेट्रोलिंग दरम्यान दुचाकी स्वाराला थांबवीले असता व दुचाकी वाहनावर समोर ठेवलेल्या पीशवीची झडती घेतल्याने त्यात देशी दारूच्या १०० बाटल्या मीळून आल्या हि दारूची वाहतूक अकोला येथुन गांधीग्राम येथे होत असल्याची माहीती पोलीसांना दिली आहे.

अकोट उपवीभागातील दहीहांडा पोलीस स्टेशन चोहोट्टा बाजार चौकी अतर्गत येत असलेल्या गांधीग्राम येथे अवैध देशी दारू वाहतूक करणार्‍यावर कारवाई करण्यात आली आहे.

संपर्क 9356215876, 9011024745

कारवाई दरम्यान ९० मीली चे १०० नग किंमत ३ हजार ५००रूपये हीरोहोंडा कंपनीची दुचाकी किंमत ३०हजार रूपये असा ऐकून ३३ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सुरज प्रताब कुमार असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असुन अकोला येथील रहीवासी असल्याची माहीती दहीहांडा पोलीसांनी दिली आहे .

याचे विरूद्ध दारूबंधी कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोदवीण्यात आला आहे.ही कारवाई दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत बीट जमादार सुदेश यादव, कर्मचारी राहुल खांडवाये यांनी केली.

दारूबंदी विभाग नावालाच दहीहांडा पोलीसांन कडून हंद्दितील अवैध दारू वाहतूक व विक्री करणार्‍यावर वारंवार कारवाया केल्याजात आहेत. तर दहीहांडा येथुनच अवैध देशी दारूचे सुत्र येथीलच येक टलाळखोर चालवीत असल्याची माहीती येथील नागरीक देत आहेत .यांच्या विरोधात दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी वारंवार कारवाया केल्या आहेत. तर येथील दारूबंदीचे अधीकारी काही कर्मचारी याच्या आशिर्वादाने हा आपला अवैध देशी दारूच्या वाहतूकीचा व्यवसाय सुरूच ठेवत दहीहांडा परीसरातील कीनखेड, कुटासा सह बर्‍याच गावामंधे देशी दारूची डिलेवरी घरपोच देत आहे याकडे दारूबंदी विभाग का दुर्लक्ष करत आहे.व ज्या दुकानान वरून ही वाहतूक केली. जाते यांच्यावर कारवाई होत नसल्याने दारूबंदी विभाग संश्ययाच्या घेर्यात आहे.