ताज्या बातम्या

दहशतवादी संघटनांंना फंडिंग केल्याप्रकरणी, जम्मू काश्मीर मध्ये NIAची ४०ठिकाणी छापमारी!

दहशतवाद्यांना आर्थिक फंडिंग केल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई,  NIA ने जम्मू काश्मीरमधील ४०ठिकाणी  छापमारी केल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली: (एनआयए) ने अर्थात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेेने काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापमारी केली  आहे. दहशतवाद्यांना आर्थिकफंडिंग केल्याप्रकरणात एनआयएनं चौकशी सुरु केली असून  जम्मू काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये धाडसत्र सुरु आहे. या चौकशी संदर्भात एनआयएच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, एनआयए  सीआरपीएफ सोबत मिळून  जम्मू काश्मीरमधील काही जिल्ह्यांमध्ये चौकशी करत आहे. अद्याप चौकशीत काय समोर आलंय याबाबत मात्र कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.  

एजंसीच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, दहशतवादी विरोधी चौकशी यंत्रणा दहशतवादी संघटना जमात -ए-इस्लामी च्या ज्येष्ठ सदस्यांशी संबंधित चौकशी करत आहे. या चौकशीच्या निमित्ताने जवळपास 40 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात एनआयएनं वेगवेगळ्या प्रकरणात छापे टाकत चौकशी केली आहे आणि काही लोकांना अटक देखील केली आहे.