sealed-property
अकोला

थकीत मालमत्ता करापोटी सहा मालमत्तांना केले सील

अकोला : मार्च अखेर जवळ येत असल्याने प्रशासनाने वसुलीला वेग दिला आहे. थकीत मालमत्ता कराचा भरणा न करणार्‍या मालमत्ता धारकांच्या मालमत्ता सील केल्या जात आहेत.

या अनुषंगानेच थकीत मालमत्ता कराचा भरणा न करणार्‍या सहा मालमत्तांना सील लावले .मालमत्ता कर वसुली महापालिकेचे उत्पन्नाचे महत्वाचे स्त्रोत आहे. महापालिकेला आर्थिक वर्ष संपुष्टात येण्या आधी १६५ कोटी रुपयाचा कर वसुल करावा लागणार आहे.

त्यामुळे करवसुलीसाठी महापालिकेने जप्ती मोहिम सुरु केलीआहे. महानगरपालिका दक्षिणक्षेत्रातील शांती नगर, शिवणी येथील गट क्रं. डी-१२, मालमत्ता क्रं. ३४७१, दाऊद खां इस्माइल खां यांचेकडे सन२०१८-१९ ते सन २०२२- २३ पर्यंतचा ७१ हजार रुपये कर थकीत होता.तसेच किसान नगर, आर्को गोडाऊनच्या मागे, शिवणी येथील गट क्रं. डी१२, मालमत्ता क्रं. ३७६८, रियाज खान अब्दुल खान यांचेकडे सन २०१८-१९ ते सन २०२२-२३ पर्यंतचा एकुण १ लाख १ हजार ८०६ रुपये.

पूर्व झोन मधील शिवणी भागातील रुखमाबाईगजानन डांबलकर यांच्याकडे १६ हजार ७९३ रुपये, हेमंत दोड यांच्याकडे ५८ हजार रुपये, हरीशचंद्र मिरगे यांच्याकडे १५ हजार १०३ रुपये, विठ्ठल पांडुरंग ३८ हजार ५५४ रुपये मालमत्ता कर थकीत होता. थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचना करुनही मालमत्ता कराचा भरणा न केल्याने या मालमत्तांना सिल लावण्यात आले.

ही कारवाई आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये मालमत्ता कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारा देविदास निकाळजे, सहा.करअधिक्षक प्रशांत बोळे, जप्ती पथक प्रमुख विजय बडोणे, सहाय्यक कर अधिक्षक देवेंद्र भोजने, पथक प्रमुख शाम राऊत, लिपिक गौतम वानखडे, प्रकाश थुकेकर,विष्णु राठोड, श्रीकृष्ण वाकोडे, महेंद्र लंगोटे, सुरक्षा रक्षक बाली इंगळे व राहुल उपरवट, संगीत शिंदे आदींनी केली. दरम्यान ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे, त्या नागरिकांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा करुन जप्तीचा अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन मालमत्ता कर विभागाने केले आहे.